पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी तुर्कस्तान आणि सीरियामध्ये ७.८ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला.
“तुर्कस्तानमधील भूकंपामुळे झालेल्या जीवितहानी आणि मालमत्तेच्या हानीमुळे व्यथित. शोकग्रस्त कुटुंबीयांच्या संवेदना. जखमी लवकर बरे होवोत. भारत तुर्कस्तानच्या लोकांच्या पाठीशी उभा आहे आणि या दुर्घटनेला तोंड देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे, असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे.