• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, July 12, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मुंबई बजेटचा धमाका, पहिल्यांदाच 50 हजार कोटी पार

by Yes News Marathi
February 4, 2023
in मुख्य बातमी
0
मुंबई बजेटचा धमाका, पहिल्यांदाच 50 हजार कोटी पार
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई महापालिकेचा 2023-24 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी मांडला.यंदाचं बजेट हे 52 हजार 619 कोटी रुपयांचे आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही.
मुंबई महापालिकेचा 2023-24 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल मांडला. यंदा मुंबई महापालिकेने विक्रमी 52 हजार कोटीचं बजेट सादर केलं. मुंबई मनपाच्या बजेटने पहिल्यांदाच 50 हजार कोटीचा आकडा पार केलं. यंदाचं बजेट हे 52 हजार 619 कोटी रुपयांचे आहे. महत्त्वाचं म्हणजे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही.
6670 कोटींनी बजेट वाढले
मुंबईचे यंदाचे बजेट 6670 कोटी रुपयांनी वाढले आहे. टक्केवारीत ही वाढ 14.52% इतकी आहे. मागील वर्षीचं (BMC Budget 2022) बजेट हे 45 हजार 949 कोटी रुपये होते.
शिक्षण
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्पात सुरुवातीला शिक्षण खात्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यंदाचे शिक्षण विभागाचे बजेट ३३४७ कोटी रूपयांचे आहे.
अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदी
• बेस्ट उपक्रमास १३८२ कोटी रुपयांची रक्कम कर्ज स्वरूपात देण्यात येणार
• मुंबई पालिकेचे २०२३-२४ चा अर्थसंकल्पीय अंदाज ५२ हजार ६१९ कोटींचा
• मागच्या वर्षी ४५ हजार ९४९ कोटींचा अर्थसंकल्प सादर
• पालिकेकडून पार्किंग ॲप विकसित करण्याचा निर्णय, ज्याद्वारे पार्किंग स्लॉटचे प्री-बुकिंग, ऑनलाईन पेमेंट आणि इतर सुविधांचा लाभ मिळणार
• कोस्टल रोडसाठी ३ हजार ५४५ कोटी रुपयांची तरतूद, याच आर्थिक वर्षात काम पूर्ण करण्याचा पालिकेचा मानस
• मुंबईकरांना पार्किंग अॅपच्या मदतीने ३२ सार्वजनिक पार्किंग लॅाट ९१ ॲानस्ट्रीट वाहनतळ सेवा मिळणार आहे
गेट-वे ऑफ इंडियाचं सुशोभिकरण होणार
• पालिकेच्या मालकीच्या सार्वजनिक वाहनतळांमध्ये इलेक्ट्रीक वाहनांकरीता चार्जिंग स्टेशनची उभारणी होणार, खासगी कंपन्यांद्वारे उभारणी होणार आणि पालिकेची उत्पन्नात भागिदारी तत्वावर महसूल उभारणीचा प्रयत्न
• पालिकेकडून मुंबई वाहनतळ प्राधिकरणाची स्थापना करणार
वाढतं प्रदूषण रोखण्यावर विशेष भर
मुंबईचा वाढत प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी पहिल्यांदा दीड हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. मुंबईचा वायु प्रदूषण कमी करण्यासाठी वायु प्रदूषण नियंत्रण कृती योजना अस्तित्वात आणली आहे. दरवर्षी हिवाळ्यात हवा गुणवत्ता निर्देशांक खराब होतो त्यामुळे हवेच्या गुणवत्ते वर परिणाम होतो
• सोबतच पालिकेच्या ताफ्याचे ई-वाहन ताफ्यात रुपांतर आणि चार्जिंग सुविधा
• बेस्टकरीता ३ हजार ईलेक्ट्रीक बसेस खरेदी करणार
• पालिकेच्या जुन्या डिझेल/पेट्रोल गाड्यांचे सीएनजीमध्ये रुपांतर
• कचरा व्यवस्थापनात देखील उपाययोजना करत वायू प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न, याकरीता काही प्रकल्प प्रगतीपथावर
• वृक्षारोपण करत १ लाख झाडे मुंबईत लावली जाणार
• अतिप्रदूषित रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करत ग्रीन बफर तयार करणार
बेस्टसाठी अर्थसहाय्य
• अर्थसंकल्पात बेस्टसाठी 1382.28 कोटी अर्थसहायय
• कोस्टल रोड साठी 3545 कोटी तरतूद
• गोरेगाव मुलुंड जोडरसत्ता 1060 कोटी
• रस्ते सुधारणा 2825.6 कोटी
• पुलासाठी 2100 कोटी
• पर्जन्यजल वहिनी 2570.65 कोटी
• सर्वजनिक आरोग्य 1680.19 कोटी
• शिक्षण विभाग 3347.13 कोटी
मुंबई महापालिका सामाजिक प्रभाव उपक्रम
• महिला ,दिव्यांग ,जेष्ठ नागरिक , तृतीयपंथी याच्या साठी भरीव तरतूद
• महिला बचतगट – 11.65 कोटी
• महिला अर्थ सहाय्य योजना – 100 कोटी
• दिव्यांग व्यक्तीसाठी अर्थ सहाय्य 25.32 कोटी
• तृतीय पंथीयांसाठी अर्थ सहाय्य 2 कोटी
• ज्येष्ठ नागरिक – 11 कोटी
• महिलासाठी प्रशिक्षण योजना 6.44 कोटी
• मुंबई महापालिका शिक्षण विभागाचे संबंधित महत्त्वाचे प्रकल्प आणि धोरणाचा अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद
शिक्षण विभाग अंतर्गत नवीन योजना व प्रकल्प
• बीएमसी शाळेतील मुख्याध्यापकांना नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार
• बीएमसी शाळेतील विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास यावर अधिक भर दिला जाणार
• मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या बदल्यांबाबत ऑनलाईन सॉफ्टवेअरची निर्मिती
• दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता साहित्य खरेदी केली जाणार
• बीएमसी शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा, बोलक्या संरक्षण भिंतीची निर्मिती, नाविन्यपूर्ण गणित व विज्ञान केंद्र उभारणी केली जाणार
मुंबईतील पाऊस आणि पूर अलर्ट प्रणाली
• पावसाळ्यातील पर्जन्यमानाची माहिती आणि पावसाचे अचूक मोजमापाची माहिती दर १५ मिनिटाला पालिकेकडून २८ ठिकाणांवरील दिली जाते.
• यात आता आणखी ६० ठिकाणींवरील माहितीची भर पडणार. सोबतच पूर चेतावणी प्रणालीची क्षमता वाढविण्याची देखील शिफारस. अर्थसंकल्पात २.६४ कोटी रुपयांची तरतूद
नवा प्रकल्प नाही
मुंबई महापालिकेच्या यंदाच्या बजेटमध्ये कोणताही मोठा नविन प्रकल्प हाती घेण्यात आलेला नाही. जे प्रकल्प हाती घेण्यात आलेत, त्या प्रकल्पांसाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे.

Previous Post

कसबा पोटनिवडणुकीची रंगत वाढली; तब्बल 90 इच्छुकांनी नेले अर्ज

Next Post

भाजपचे उमेदवार जाहीर; कसब्यासाठी हेमंत रासने तर चिंचवडसाठी अश्वीनी जगताप

Next Post
भाजपचे उमेदवार जाहीर; कसब्यासाठी हेमंत रासने तर चिंचवडसाठी अश्वीनी जगताप

भाजपचे उमेदवार जाहीर; कसब्यासाठी हेमंत रासने तर चिंचवडसाठी अश्वीनी जगताप

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group