आज बुलियन्सच्या वेबसाईटवर जारी करण्यात आलेल्या दरांनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 58,500 रूपयांवर आला आहे.
जागतिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होतेय.
कालच (बुधवारी) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-24 चा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये सोन्या-चांदीचे दर आणखी महाग होणार असे त्यांनी सांगितले.
तसेच, आर्थिक मंदीची भीती आणि डॉलरच्या संख्येत झालेली वाढ हे देखील दरवाढीचं कारण आहे.
आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, 24 कॅरेट सोन्याचा दर 58,500 रूपयांवर आला आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 53,625 रूपयांवर आला आहे.
आज एक किलो चांदीचा दर 71,520 रूपयांवर आला आहे. सोन्याच्या दरात तब्बल 2,700 रूपयांची वाढ झाली आहे.
सोन्याचे हे वाढलेले दर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि राजधानी दिल्लीसह इतर ठिकाणीही कमी-जास्त प्रमाणात व्यवहार करतात. सुवर्णनगरी जळगावमध्येही सोन्याचे दर तब्बल 59 हजारांच्या घरात पोहोचले आहेत.
सोन्या-चांदीच्या दरात झालेली वाढ ग्राहकांना परवडत नसल्याने अनेक ग्राहकांनी सोनं खरेदीसाठी वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेतली आहे.