No Result
View All Result
करमाळा चा “ सायन्स वाॅल “उपक्रम जिल्ह्यात राबविणार
- सोलापूर – दशसुत्री अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करा असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिईओ दिलीप स्वामी यांनी केले. करमाळा तालुक्यांतील कोंढारचिचोली येथील प्राथमिक शाळेस सिईओ दिलीप स्वामी यांनी आज भेट देऊन शाळेची पाहणी केली. तसेच शिक्षण परिषदेस उपस्थित राहून मार्गदर्शन केले. या प्रसंगी गटविकास अधिकारी मनोज राऊत, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, कोंढारचिंचोली चिंचोली मुख्याध्यापक हिराकांत शिंदे, सरपंच शरद भोसले, ग्रामसेवक शिवाजी बोराडे, माजी सरपंच दिलीप काका गलांडे उपस्थित होते. पुढे त्यांनी स्वच्छ सुंदर शाळा असलेल्या या शाळेतील “सायन्स वाॅल” उपक्रमाची पाहणी केली. ३ लाख रूपये लोकवर्गणीतून उभारलेल्या सायन्स वाॅलची पाहणी करून सिईओ दिलीप स्वामी यांनी समाधान व्यक्त केले.
- सोलापूर जिल्हयात दशसुत्री अभियान प्रभावीपणे राबविणेसाठी प्रयत्न करा, रजिस्टर ठेवा. प्रत्येक उपक्रम काटेकोर पण राबवा. तालुका स्तरावर मुख्याध्यापक यांना प्रशिक्षण दिले. शिक्षकांना याबाबत मुख्याघ्यापकांनी प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. शिक्षण परिषदेस उपस्थित असलेल्या शिक्षकांनी विविध उपक्रम सांगून आपल्या कार्यांची प्रचिती दिली. शिक्षक टोकावरचे शाळेत राबवित असलेले उपक्रम पाहून सिईओ दिलीप स्वामी यांनी समाधान व्यक्त केले.
- सायन्स वाॅल संकल्पना उत्कृष्ठ – सिईओ स्वामी
गटविकास अधिकारी मनोज राऊत यांचे संकल्पनेतून राबविलेले सायन्स वाॅल उपक्रम जिल्ह्यातील सर्व शाळांत राबविणेत येणार आहे असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. गावातील चौकांना वैज्ञानिकांची नावे, सायन्सची माहिती देणारे बोलक्या भिंती, मैदानात उभारलेले पृथ्वी क्षेपणास्त्र, सायन्स वाॅल व सोबत विविध वैज्ञानिक साहित्य यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव मिळत असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
- दशसुत्री वरून शिक्षकांची कान उघाडणी –
दशसुत्रीची माहिती काही शिक्षकांना व्यवस्थित देता आली नाही. त्यामुळे त्यांनी शिक्षण परिषदेस उपस्थित असलेल्या शिक्षकांची कानउघाडणी करून शाळेत अभियानाचे रजिस्टर ठेवणेचे सुचना सिईओ दिलीप स्वामी यांनी दिल्या. तात्काळ सुरू असलेल्या व्हीसी द्वारे त्यांनी जिल्ह्यातील शिक्षणविभागातील गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी यांची देखील कान उघाडणी करून दशसुत्री अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणेचे सुचना दिल्या.
- शाळेतील नारळ व नारळपाणी देऊन सीईओंचे स्वागत ..!
कोंढार चिंचोली शाळेतील प्राथमिक शिक्षक व विद्यार्थी व पालक यांनी जिवापाड जपलेली नारळाची झाडांना गेल्या वर्षी पासून नारळ लागले आहेत. सिईओ दिलीप स्वामी यांचे स्वागत बागेच फुलेली फुले व शाळेचे अंगणातील नारळांचे झाडाला लागलेले नारळ काढून स्वागत केले. चहा एवजी नारळ पाणी देऊन सिईओ दिलीप स्वामी व उपस्थित अधिकारी यांचा पाहुणचार केला.
No Result
View All Result