सोलापूर : माघवरी पालखी सोहळा परंपरेने श्री क्षेत्र पंढरपूरला पायी चालत जात असतो. " जाता पंढरीसी सुख वाटे जीवा "या उक्ती प्रमाणे हजारो वारकरी भाविक नामाच्या गजरात उत्साहात चालत जातात. या सोहळ्यातील तिसरे भव्य गोल रिंगण मोहोळ तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय पेनुर येथे दि. 30 - 01- 2023 रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले. हा रिंगण सोहळा सुरु करून ऐतीहसिक परंपरा सुरु झाली आहे. मोहोळ मार्गे पंढरपुरला जाणाऱ्या दिंडीतील पेनुर येथे हे रिंगण प्रथमच सुरु झाले आहे.
माघवारी सोलापूर रिंगण सोहळा 12 वे वर्ष असल्यामुळे तप:पूर्ती वर्ष साजरे करण्यात येत आहे. त्या निमित्त मोहोळ मार्गे पंढरपुरला जाणाऱ्या दिंडीचे रिंगण सोहळासाठी एकत्रीकरण करून सोलापुरातील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी व संत तुकाराम महाराज पालखी यांच्या पुजनाने या कार्यक्रमास प्रारंभ झाला . अखिल भाविक वारकरी मंडळ पालखी सोहळा समिती अध्यक्ष मधुकर गायकवाड , किसन कापसे, संजय पवार , जोतीराम चांगभले, बळिराम जांभळे , बंडोपंत कुलकर्णी यांच्या कडून पेनुर ग्रामस्थांचा ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला. तसेच उपाध्यक्ष प्रकाश सावंत, किरण चिप्पा, श्रीकांत ढगे, छाया खंडाळकर , सतिश भोसले यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले. ग्रा. पं. सदस्य रामदास चवरे , सरपंच सुजित अवारे , उपसरपंच सागर चवरे , ह भ प भारत चवरे आदी पदाधिकारी यांचे हस्ते रिंगणातील मानाच्या आश्र्वचे पूजन करण्यात आले . सर्व दिंडी प्रमुख - विणेकरी यांचा सत्कार करून रिंगण सोहळा सुरु करण्यात आला . पेनुर पंचक्रोशितील भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. हजारो भाविकांनी उपस्थित राहून आनंद घेतला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत पेनुर यांच्या कडून परिश्रम करण्यात आले.