- सोलापूर – जिल्हा नियोजन अतंर्गत अखर्चित निघी राहिलेस तांत्रिक अधिकारी यांचेवर कारवाई करणेत येणार आहे. “आता तोंडी सुचना बंद या पुढे कारवाई द्वारे सुचना देणेत येतील, तशी तयारी ठेवा. कामात कुचराई केली तर याद राखा” असा सज्जड इशारा आज सिईओ दिलीप स्वामी यांनी समन्वय सभेत दिला. आज बैठकीस अनुपस्थित असलेल्या 6 अधिकारी यांचेवर कारवाईची नोटीस देणेत आली आहे.
- जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज जिल्हा व तालुका स्तरावर काम करणारे अधिकारी यांचे समन्वय सभेचे आयोजन करणेत आले होते. या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता पंडित भोसले, कार्यकारी अभियंता दिपक कोळी, कृषी अधिकारी कुंभार, प्रभारी प्रकल्प संचालक उमेशचंद्र कुलकर्णी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी प्रमुख उपस्थित होते. यांचेसह सर्व गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. नुतन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोईनकर यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणेत आले. या बैठकीस अनुपस्थित असलेल्या पशुसंवर्धन विभागाची चार अधिकारी, बालिका प्रकल्प अधिकारी १ व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी यांनी कारणे दाखवा नोटीसा बजावणेत आले आहेत.
- जिल्ह्यात घरकुलाची कामे वेळेत का होत नाहीत? सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनचे आराखडे सादर करून देखील तांत्रिक मान्यता का देणेत आले नाहीत? सार्वजनिक शौचालयांची कामे प्रलंबित का आहेत? १५ वा वित्त आयोगाचा निधी खर्च का होत नाही? अपुर्ण बांधकामे वेळेत का करत नाही अशा अनेक सुचना देत कारवाईचा इशारा सिईओ दिलीप स्वामी यांनी दिला.
- अखर्चित निधी राहिलेस जबाबदारी निश्चित
जिल्हा नियोजन समिती अंतर्गत सन २१-२२ मधील निधी अखर्चित राहिलेस संबंधित तांत्रिक अधिकारी यांची जबाबदारी निश्चित करणेत येईल अशा इशारा सिईओ दिलीप स्वामी यांनी दिला. सर्व निधी वेळेत खर्च होईल याची दक्षता घ्या. जी कामे सुरू हो का नाहीत त्या कामाचे रद्दचे प्रस्ताव गटविकास अधिकारी यांनी पाठवून द्यावेत अशा सुचना देखील सिईओ दिलीप स्वामी यांनी दिले.
- जलजीवन, बांधकाम, जनसुविधाची कामे तपासण्याचा अधिकार, सिडीपिओ व विस्तार अधिकारी यांना ;
…..अन्यथा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकेन
याबैठकीत सीईओ स्वामी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांचे कान टोचले, सोलापूर जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत शेकडो कामे सुरू आहेत त्याचबरोबर बांधकाम विभाग यासह जन सुविधा, नागरी सुविधा यांचीही कामे आता सुरू होतील त्यामुळे प्रत्येक कामाची तपासणी झालीच पाहिजे. अभियंते हे तर पाहतीलच परंतु कामे तपासण्याचे अधिकार मी आता विस्तार अधिकारी, सिडीपीओ यांना देतो, तसे आदेश गटविकास अधिकारी यांनी काढावेत. मक्तेदारांच्या कामात हलगर्जीपणा आढळला तर त्यांना थेट काळ्या यादीत टाकण्याची शिफारस करावी. आमच्याकडून तात्काळ कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा स्वामी यांनी यावेळी दिला.
- अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोईनकर यांनी सर्व शाखा अभियंता व उप अभियंता यांनी तांत्रिक मान्यता वेळेत द्या, सार्वजनिक शौचालये बाजारपेठेची ठिकाणे व तिर्थक्षेत्राचे ठिकाणी घ्या अशा सुचना दिल्या. कामात हालगर्जी पणा करू नका. असेही त्यांनी ठामपणे सांगितले. जिल्हा नियोजन अतंर्गत निधी वेळेत खर्च करा असे सांगून कामाचे नियोजन करा व त्या प्रमाणे प्रभावी अंमलबजावणी करा असे सांगितले.
- उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी पाणी पुरवठा व स्वच्छता तसेच ग्रामपंचायत विभाग अंतर्गत प्रलंबित कामांचा आढावा घेतला. कामे वेळेत होत नसतील तर रद्द करा. निधी परत घालवणेत अर्ध नाही. यावर जबाबदारी निश्चित होईल असेही त्यांनी ठामपणे सांगितले.