न्यूझीलंडने टॉस जिंकत भारतीय संघाला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले.
भारतीय संघ आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जर भारतीय संघाने हा सामना जिंकला तर तो मालिकेत न्यूझीलंडला 3-0 ने क्लीन स्वीप करेल. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना हैदराबादमध्ये खेळला गेला, ज्यामध्ये टीम इंडियाने रोमहर्षक पद्धतीने 12 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात सलामीवीर शुभमन गिलने 208 धावांची द्विशतकी खेळी खेळली. तर रायपूर येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने 8 गडी राखून विजय मिळवला.
न्यूझीलंडविरुद्धच्या या मालिकेपूर्वी भारतीय संघाने शेवटच्या 10पैकी फक्त एक वनडे जिंकली होती. यादरम्यान टीम इंडियाला 6 मॅचमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. तर तीन सामने अनिर्णित राहिले भारतीय कर्णधार रोहित शर्माने तिसऱ्या वनडेसाठी प्लेइंग-11 मध्ये दोन मोठे बदल केले आहेत. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि लेगस्पिनर युजवेंद्र चहलला संधी देण्यात आली आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, उमरान मलिक. न्यूझीलंड संघ: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (wk/c), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, लॉकी फर्ग्युसन, जेकब डफी, ब्लेअर टिकनर