No Result
View All Result
- सोलापूर रेल्वे विभागानी सोनेरी चतुर्भुज (Guiden Quadrilateras ) मार्ग मुंबई- चैनई महत्वपूर्ण मार्गाला इलेक्ट्रीक तथा डबल लाइनद्वारे मागील वर्षी जोडला गेला. सोलापूर विभाग या महत्वपूर्ण मार्गातील ‘दख्खन द्वार ‘ मानले जाते, जे २०२२ या वर्षात सर्व जनाच्या रेल्वे सेवेसाठी बऱ्याच वर्षापासून बहुप्रतिक्षेत होते ते ‘ महाद्वार नेहमीसाठी उघडले गेले , ट्रॅक्शन चेंज करण्यासाठी लागणारा विलंब कमी होईल व संरक्षा अधोरेखीत होईल, गाड्यांची संख्या वाढवता येईल, गती सुधारण्यासाठी विशेष मदत होईल, इलेक्ट्रीक ट्रॅक्शनमुळे डिझेल इंधनावरती असणारे पराबलंबीत्व नष्ट होईल, वातावरणाला अलग परिमान देण्याचे काम या निमित्ताने अग्रेषीत होईल. सोलापूर – मोहळ व पांगरी – औसा हा छोटा खंड इलेक्ट्रीक ट्रॅक्शननी या वर्षी जोडला गेला. भिगवण वासींबे व काष्टी – बेलवंडी हा महत्वपूर्ण मार्ग एकेरी मार्ग डबल लाईननी जोडला गेला. अहमदनगर ते परळी या महत्वपूर्ण मार्गातील अहमदनगर – न्यू आष्टी प्रवाश्यासाठी ( 71 KMS ) हा रेल्वेमार्ग दि.23.09.2022 ला खुला करण्यात आला, ज्याचे उद्घाटन रेल्वे राज्यमंत्री, उप – मुख्यमंत्री व मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर यांच्या शुभ हस्ते झाले, हा बहुप्रतिक्षेत असलेला स्वप्न पूर्तिचा सोहळा भव्य व दिव्य पार पडला. या मार्गावरती दूसरी फेरी दि. 17 नोव्हेंबर 2022 ला सुरु केली गेली. इलेक्ट्रीक ट्रॅक्शन सुचारूपणे चालू रहावे या हेतूने सलगरे, गौडगाँव व औसा येथे ट्रॅक्शन सब स्टेशन् कार्यान्वित करण्यात आली. ट्रॅक्शन् संबंधीत खराबी दूर करण्यासाठी कुडूवाडी, सोलापूर पारेवाडी येथे टावर वैगन रोड साथडीज् व डेपो उभारण्यात आले.
- संपूर्ण वर्षात् अकरा लूप लाईनची प्रतिबंधीत गती वाढवण्यात आली ज्यामुळे गाडीची विलंबतर कमी झाली . इलेक्ट्रीक ट्रॅक्शनची आपूर्ती एनटीपीसी होटगी, चेट्टीनाड, झुआरी व अल्ट्राटेक सिमेंट कारखाना सायडींगपर्यंत वाढवण्यात आली. सोलापूर रेल्वे विभागानी या वर्षी मालवाहतुकीतून महसूल 558.79 करोड आय प्राप्ती केली. जो मागील वर्षापेक्षा 13.64 % अधिक आदि साखर वाहतुकीसाठी विभागातून अधिकतम् 525 रॅकची पाठवणूक करण्यात आली. विविध मालवाहतूक करण्यासाठी नविनतम् रॅकची श्रोत उपलब्ध करण्यात आली . टिकीट तपासणीच्या विशेष मोहीमेतुन वार्षिक महसूल 32.07 करोड रेल्वे विभागाला प्राप्त झाला, जो 133.41% गत वर्षापेक्षा जास्त आहे . वित्तीय पडताळणी अनुबंधातून वर्ष 2022 मध्ये 160 करोड रु .ची बचत करण्यात आली.
- सेटलमेंट विभागाअंतर्गत पडताळणीमधून रु. 2.81 करोड स्थापना, विभागमध्ये 76.91 लाखची बचत करण्यात आली. रेल्वे विभागाकडून सुटचा फायदा घेत रु. 10,91,581 उर्जा बिलामध्ये फायदा मिळाला होता. 14 कन्वेन्शनल पम्प बदलून एनर्जी इफिसिएन्ट पम्प बसवून भविष्यामध्ये बचतीचे उपाय शोधले गेले. यार्डमध्ये व इतर ठिकाणी डिझेल इंजिनना बंद करून इंधनाची रु .4.92 करोड बचत केली गेली या विभागानी इलेक्ट्रोनिक्स इंटरलॉकिंग ची मांडणी करून रु. 105 करोड बचत केली गेली.
- सोलापूर रेल्वे विभागाकडून रेल्वे प्रवाश्यासाठी अनेक सुविधा प्रदान केल्या ज्यामध्ये प्रामुख्याने लातूर स्टेशन येथे प्लॅटफॉर्म नं 01 व 2 ची लांबी वाढवून 24 ( कोच ) डब्याची गाडी बसेल याची सोय करण्यात झाली 49 स्टेशनवरती दिव्यांगजन प्रवाश्यासाठी टॉयलेट ( संडास ) ची सोय करण्यात आली. लातूर स्टेशन येथे 100 फूट उंच व व्यावर 20×30 फुट असा “स्मारक ध्वज ” उभा करण्यात आला. 04 लिफ्टची सुविधा कलबुर्गी स्टेशनवरती उभारण्यात आली. यातायात वाढावी या उदात्त हेतूने नविन गाडी क्रं. 20657/20658 आठवड्यातून एक वेळेस व्हाया सोलापूर , कुर्डूवाडी, दौंड व मनमाड मार्गे दि.14.10.22 पासून चालू करण्यात आली सोलापूर – कोल्हापूर – सोलापूर गाडीचा विस्तार कलबुर्गी स्टेशन पर्यंत ( ट्रेन नं 22154/55 करण्यात आला. जास्तीत जास्त मालगाड्यांची विशेष तपासणी एकूण 1235 वाडी व दौंड या स्टेशनवरती करण्यात आली जी गेल्या वर्षाच्या (2021) तुलेनेन 16.95 % अधिक होती. दौंड व वाडी येथे कार्यासाठी खराब असलेल्या मालगाडीचे डबे एकूण 1826 दुरुस्त करून देण्यात आले किसान स्पेशन व एनएमजी रॅक एकूम 194 याची तपासणी करून देण्यात आले सोलापूर विभागाकडून भंगार विक्रीतून ऑपरेटींग विभागाकडून एकूण 07.38 मेट्रीक टणाचे लोडींग करण्यात रु. 9.19 करोंड प्राप्त झाले. मागील वर्षाच्या तुलनेत 9.89 % जास्त आहे . कर्मिक विभागाकडून या वर्षी 442 कर्मचा-याना नियुक्त करण्यात आले व 114 नवनियुक्त कर्मचाऱ्यांना दि. 22.11.2022 रोजी आमंत्रित करून नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आली. राजभाषा विभागातर्फे आयोजित मुख्यालयामध्ये नाट्य महोत्सवामध्ये सोलापूर विभागा तर्फे हिंदी नाटक ‘सत्तू लोहार’ प्रदर्शित करण्यात आला, ज्यामध्ये त्यांना ‘ तृतीय स्थान प्राप्त झाले.
- सिग्नल आणि टेलिकॉम विभागाकडून भविष्यातील वाढीव गती अनुबंधासाठी एकूण डबल डिस्टंट 42 स्टेशन वरती व 07 लेवल क्रॉसींग फाटकावरती लावण्यात आली जुने पॅनल इंटरलॉकिंग सिस्टमला काढून नविन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग 31 स्टेशन वरती बसवण्यात आली. सुरक्षाचेच्या दृष्टीकोनातून नविन संसाधने जसे उदा. BPAC, DAC, USFB आणि QUAD केबल, विविध स्टेशनवरती उभाराचेकाम युद्धपातळीवर चालू आहे.
- सुरक्षा विभागातर्फे 58 केसेस मध्ये 36 मुलाना व 22 मुलीना त्यांच्या पालकाकडे सुपूर्द करण्यात आले 5 केसेस मध्ये लोकांचे विभागाला यश प्राप्त झाले. 23 केसेसमध्ये गंभीरगुन्हेगारना पकडण्यात आले. 238 केसेस मध्ये रेलवे प्रवाश्यांना, अपंग, आजारी, जखमी व वयस्क लोकांना, स्त्रीयांना मदत करण्यात आली. 03 केसेस मध्ये गांजा मादक पदार्थ पकडण्यात आला . 03 फेसेस मध्ये गर्भधारिणी स्त्रीयांना मदत करण्यात आली, 14 केसेसमध्ये E- टिकीट / PRS सिस्टम चालवणार एजेंट व्यक्तीना त्यानी, करत असलेल्या गैरवाराला आळा घालण्यासाठी उचित दंडीत केले गेले. रेल्वे प्रवाश्यासाठी चार फुटओवर फ्रीज व एक RUB रेल्वे विभागातर्फे बोधण्यात आले. स्टेशन, विभिन्न विभागीय डेपो ARI/ARME. इत्यादी ठिकाणी रेट्रो रिफ्लेक्टीव्ह लाकडाचे गुटखे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तयार करण्यात आलेले, इंजिनियरींग लेवल क्रॉसिंग फाटक क्र.28. ( पारेवाडी स्टेशन ) ला कायमस्वरूपी बंद करण्यात आले.
- सोलापूर येथील विभागीय इंजिनियरीपुर ट्रेनिंग सेंटरचे व वाडी रनिंग रुमच्या समोरिल दर्शनी भागात मियावाकी तंत्रज्ञानावर आधारीत् ‘ रेल वन् बिहार ‘ इन् हाउस पद्धतीने वरील दोन्ही ठिकाणी उभारण्यात आले. या तंत्रज्ञानात बायोमास, सेंद्रिय शेणखत, ड्रिप इरीगेशनचा वापर करून, स्थानिक लोकांची भरती घेऊन गैर सरकारी संघटना या सहकार्यांनी विविध जंगली वृक्ष वेली, फळ व फुलांची रोपे तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली एकूण सोलापूर येथे 630 रोपे/झाडे व वाडी या ठिकाणी 1420 रोपे लावण्या आली ज्यामुळे भविण्यात सृष्टीला मनोहर करण्याचा प्रयत्न रेल्वे विभागातर्फे करण्यात येत आहे.
- सोलापूर रेल्वे विभागानी केलेल्या अथक परिश्रमाची पावती म्हणून मध्य रेल्वेची अत्यंत प्रतिष्ठित “संरक्षा शिल्ड” रोलिंग स्टॉक ची प्रतिक्षित शिल्ड ट्रेन लायटिंग विधागाला, ऊर्जा बचतीसाठी इलेक्ट्रीक ट्रैक्शन रोलींग शील्ड ‘टिआरडी’ विभागाला व अस्पताल विभागाला ‘ मेडिकल शील्ड, इंजीनिअरिंग विभागाला उत्कृष्ठ कार्यासाठी झोनल शील्ड व इंजीनिअरिंग कंट्रक्शन विभागाला “झोनल शील्ड” माननीय मध्य रेल महाप्रबंधाक यांच्या तर्फे प्रदान करण्यात आली. सोलापूर विभागाचा रेलवे कार्यामध्ये विशेष स्थान प्राप्त केले आहे. रेलवे अधिकाऱ्याच्या विशेष कार्यशैलीमुळे रेले उत्पादनात विशेष वाढ झालेली अधोरेखीत होते, ज्या मुळे राष्ट्रीय कार्यात दरडोई उत्पन्नाची वाढ होत आहे. या राष्ट्रीयकार्यात कार्यरत कर्मचाऱ्यांनी आपले विशेष योगदान दिलेले आहे.
No Result
View All Result