गडकरी यांच्या खामल्यातील जनसंपर्क कार्यालयात शनिवारी सकाळी जयेश कांथा याने थेट दाऊदचे नाव घेऊन फोन केला. गडकरींनी १०० कोटी रुपयांची खंडणी द्यावी अन्यथा भाजपच्या जनसंपर्क कार्यालयात आणि गडकरी यांच्या घरी बॉम्बस्फोट करू, अशी धमकी दिली. त्यामुळे नागपूर पोलिसांनी तत्परता दाखवून सायबर क्राईमच्या मदतीने जयेश कांथाचा शोध लावला. तो बेळगावातील कारागृहात फाशीची शिक्षा झालेला कैदी असल्याचे लक्षात आले.
गडकरी यांना १०० कोटींच्या खंडणीची मागणी
गडकरींनी १०० कोटी रुपयांची खंडणी द्यावी अन्यथा भाजपच्या जनसंपर्क कार्यालयात आणि गडकरी यांच्या घरी बॉम्बस्फोट करू, अशी धमकी आरोपीने दिली होती.
करून बॉम्बस्फोटने उडवण्याची धमकी देणाऱ्या जयेश कांथा ऊर्फ शाहिदने नागपूर पोलिसांना चक्रावून सोडले आहे. ‘आरोप करण्यापूर्वी स्मार्टफोन शोधा आणि सीमकार्ड पण दाखवा’, अशी भूमिका घेत त्याने पोलिसांना भंडावून सोडले आहे.
गुन्हे शाखेचे एक पथक बेळगाव कारागृहात दाखल झाले आणि त्यांनी लगेच जयेश कांथा याच्या बॅरेकची झाडाझडती घेतली व तेथून एक डायरी जप्त केली. गुन्हे शाखेने सोमवारी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. बेळगाव कारागृहातच त्याची चौकशी सुरू केली. जयेशने ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेत नागपूर पोलिसांना त्रस्त करून सोडले. ‘मी ज्या स्मार्टफोनवरून कॉल केला तो फोन दाखवा किंवा ज्या सीमकार्डवरून कॉल केला, ते सीमकार्ड दाखवा’, असे प्रतिप्रश्न जयेश पोलिसांना विचारत आहे. त्यामुळे पोलिसांना डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे. जयेश हा पोलिसांना सहकार्य करीत नसून फोन केल्याबाबतही नकार देत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.