सोलापूर,(प्रतिनिधी):- मॅरेथॉन स्पर्धा सोलापूरमध्ये होत असते त्याचबरोबर मॅरेथॉन एक्स्पो भरवणे हा चांगला उपक्रम आहे असे प्रतिपादन सोलापूर महागनर पालिकेच्या आयुक्त शितल उगले तेली यांनी केले. सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने नूमवि प्रशालेत आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन एक्स्पो च्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या वैशाली कडुकर, आपटे डेअरीचे सारंग आपटे, गायत्री आपटे, शार्दुल आपटे, ह.दे.प्रशालेचे अध्यक्ष राजेश पटवर्धन, सोलापूर रनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. स्वप्निल कोठाडीया उपस्थित होते.
सोलापूरकरांच्या आरोग्यासाठी डॉक्टरांनी पुढाकार घेवून मॅरेथॉनचे आयोजन केले जाते हे सोलापूरकरांच्या दृष्टीने चांगली बाब आहे. असेही मनपा आयुक्त शितल उगले तेली यांनी सांगितले. मॅरेथॉन स्पर्धेत सातत्य ठेवून सोलापूर रनर्स असोसिएशनने चांगला उपक्रम सुरू केला असल्याचे पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या वैशाली कडुकर यांनी सांगितले.
सोलापूरमधील जुने आणि प्रसिध्द अशा आपटे परिवाराने नव्याने सुरू केलेल्या आपटे डेअरीच्या माध्यमातून सोलापूरकरांना स्वच्छ निर्भेळ आणि पौष्टीक दूध तसेच दुग्धजण्य पदार्थ पुरवण्याचा व्यवसाय सुरू केला त्या व्यवसायाचे सहकार्य सोलापूर मॅरेथॉनला प्रायोजकत्वाच्या रूपाने देण्यात आल्याचे गायत्री आपटे यांनी सांगितले.
प्रारंभी मान्यवरांचे स्वाग करण्यात आले नंतर त्याच्या हस्ते मॅरेथॉन ए्नस्पोचे उदघाटन करण्यात आले नंतर मुला मुलींनी योगाचे विविध प्रकार सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. या एक्स्पो मध्ये विविध प्रकारचे स्टॉल्स लावण्यात आलेले होते त्यातून विविध माहिती स्पर्धकांना देण्यात आली तसेच रविवार दि. 8 जानेवारी रोजी होणाऱ्या आपटे डेअरी सोलापूर मॅरेथॉन मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना टी शर्ट आणि टाईम बीबचे वितरणही यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष डॉ. स्वप्नील कोठाडीया, कार्याध्यक्ष डॉ. विश्वास बिराजदार, खजिनदार डॉ. योगेश जडे, रेस डायरे्नटर डॉ. विक्रम दबडे, माजी अध्यक्ष डॉ. यशवंत पेठकर, डॉ. विनायक देशपांडे, डॉ. विवेक कुलकर्णी, डॉ. भास्कर पाटील, डॉ. नितीन बलदवा, डॉ. गोरख रोकडे, डॉ. गुरू जालीमिंचे, डॉ. किरण किणीकर, डॉ. महेश बिलुरे, डॉ. प्रदीप भोई, डॉ. सुभाष भांगे, अभय देशमुख, अजित वाडेकर, बसवराज कडगंची , संजय सुरवसे, जयंत होलेपाटील, श्रीनिवास संगा, स्वप्नील नाईक, रोषण भुतडा, ओंकार दाते, डॉ. विठ्ठल कृष्णा नूमवि प्रशालेच्या मुख्याध्यापिका, क्रिडा शिक्षक चुंगे सर आदींसह स्पर्धक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.