येस न्युज मराठी नेटवर्क : यंदाच्या सोलापूरमध्ये सोलापूर रनर असोसिएशनच्या वतीने आयोजित व आपटे डेअरी पुरस्कृत सोलापूर मॅरेथॉनमध्ये सोलापूरचा राष्ट्रीय धावपटू साईश्वर केशव गुंटूक 21 किमी अंतर रनिंगमध्ये सहभाग नोंदविला असून सोलापूर रनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. स्वप्नील कोठाडीया व आपटे डेअरी चे अभिषेक आपटे यांनी रजिस्ट्रेशन करून साईश्वरचे या मॅरेथॉनमध्ये स्वागत केले आहे. तसेच 7 तारखेला होणाऱ्या एक्स्पोच्या उद्घाटनच्या दिवशी महापालिका आयुक्त शीतल तेली- उगले मॅडम यांच्या उपस्थितीत साईश्वरला विशेष आमंत्रित करण्यात आले. 8 जानेवारी रोजी नागपूर येथे होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये साईश्वरची रेस आंबेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. तरी साईश्वर नागपुरच्या मॅरेथॉनमध्ये सहभाग न नोंदविता आपल्या सोलापूर मॅरेथॉनमध्ये उस्फूर्त सहभाग घेत आहे. यासाठी गेल्या काही महिन्यांपासून याचा सरावही करत आहे. या वयोगटात 21 कि.मी धावणारा साईश्वर हा एकमेव धावपटू आहे.