राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ- डॉ.पी.एस.शिरगुरे
सोलापूर : पिकांच्या उत्पादनासाठी अलीकडे रासायनिक खतांचा अति वापर होत असल्याने जमिनीची उत्पादन क्षमता घटू लागली आहे. सेंद्रिय खताचा वापर वाढविल्यास जमिनीची उत्पादन क्षमता वाढवून पिकांची उत्पादकता वाढवता येईल. असे राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.पी.एस.शिरगुरे यांनी सांगितले.
शबरी कृषि प्रतिष्ठान, सोलापूर संचलित कृषि विज्ञान केंद्र, सोलापूर तर्फे दत्तकग्राम किणीवाडी, ता. अक्कलकोट येथे ०५ डिसेंबर २०२२ रोजी जागतिक मृदा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. पी. एस. शिरगुरे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि विज्ञान केंद्र, सोलापूरचे वरीष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. ला. रा. तांबडे. विभागीय कृषि संशोधन केंद्र, सोलापूरचे वरीष्ठ शास्त्रज्ञ (मृदा शास्त्र) डॉ. नितीनकुमार रणशूर उपस्थित होते.
जमिनीतील अन्नद्रव्याचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढविल्यास जमिनीचे उत्पादन क्षमता वाढवून पिकांचे उत्पादकता वाढवता येईल. तसेच जमिनीची पीक उत्पादकता टिकवायचे असेल तर मातीच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे त्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन घेऊन पीक उत्पादनासाठी शेणखताचा वापर वाढवून त्याचे जीवामृतासारखे सेंद्रिय खत तयार करून वापरावे असे ही डॉ.शिरगुडे यांनी यावेळी सांगितले.
वर्षानुवर्षे घेत असललेल्या पिकांमुळे जमिनीततील अन्नद्रव्याचे प्रमाण कमी होत असून, भविष्यात रासायनिक खतांचा वापर कमी करून त्याजागी सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी कृषि विज्ञान केंद्र आपणास आवश्यक मार्गदर्शन करेल. यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा असे कृषि विज्ञान केंद्राचे वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ला. रा. तांबडे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी केंद्रिय कृषि मंत्री यांचा शेतक-यांसाठी पाठवलेला संदेश वाचून दाखविला. प्रमुख व्याख्याते डॉ. नितीनकुमार रणशुर यांनी अन्नाची निर्मितीची सुरुवात मातीपासुन होतेय. माती हा अत्यंत महत्वाचा घटक आहे.पिकाच्या वाढीसाठी प्रमुख अन्नद्रव्याबरोबरच इतर दुय्यम व सुक्ष्म अन्नद्रव्याची गरज असल्याचे यावेळी सांगितले.
यावेळी किणीवाडी गावातील शेतक-यांना जमिनीच्या आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक विशेषज्ञ (कृषि विस्तार) प्रदिप गोंजारी यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्र संचालन विषय विशेषज्ञ (कृषि विद्या) अमोल शास्त्री तर आभार प्रदर्शन प्रयोग शाळा तंत्रज्ञ विवेक माने यांनी केले.