सोलापूर : सिद्धेश्वर कारखान्याने उभारलेल्या बेकायदेशीर चिमणी चा विषय चांगलाच गाजत असताना आता प्रदूषणाचा विषय देखील चांगला चव्हाट्यावर आला आहे. काल राष्ट्रीय हरित लवाद म्हणजेच एनजीटी समोर सिद्धेश्वर कारखान्याच्या प्रदूषणासंदर्भात सुनावणी झाली यावेळी एनजीटी कोर्टाने कारखान्याला चांगलेच फैलावर घेतले. प्रदूषणाच्या कायद्याचे तुम्ही उल्लंघन केले आहे .प्रदूषण नियंत्रण मंडळाची एनओसी घेतली नसताना कारखान्याचे गाळप हंगाम सुरू कसे केले अशा शब्दात एनजीटीने कारखान्याची खरडपट्टी केली आहे आजवर तुम्ही सर्वच नियम धाब्यावर बसवले अशा शब्दात कारखान्यावर एनजीटीने ताशेरे ओढले आहेत कारखाना बंद करण्याबाबत आम्ही ऑर्डर काढणार आहोत असे न्यायाधीशांनी यावेळी सांगितले .काल संध्याकाळपर्यंत ही ऑर्डर अपलोड झाली नव्हती. आज संध्याकाळपर्यंत कारखाना बंद करण्याबाबत कोर्टाने दिलेला आदेश अपलोड होईल अशी माहिती यांची NGT कोर्टाचे एडवोकेट विलास जाधव यांनी एस न्यूज मराठीशी बोलताना दिली