येस न्युज नेटवर्क : ऑस्ट्रेलियाच्या भूमीत सुरु टी20 विश्वचषक स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सुपर 12 चे साखळी सामने संपले असून आता सेमीफायनल सामन्यांना सुरुवात होणार आहे. भारत, पाकिस्तानसह इंग्लंड आणि न्यूझीलंड हे चार संघ सेमीफायनलमध्ये पोहोचले असून एकमेंकाविरुद्ध सामन्यानंतर यातील दोनजण फायनलचा सामना खेळणार आहेत. साखळी सामन्यांचा विचार करता दोन्ही ग्रुपमधून सर्वाधिक म्हणजेच 8 गुणांसह भारताचा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे.
तर सामन्यांचा विचार केला तर सर्वात पहिली सेमीफायनल पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये 9 नोव्हेबर रोजी सिडनीच्या क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. तर त्यानंतर लगेचच 10 नोव्हेंबर रोजी भारत आणि इंग्लंड हा सामना अॅडलेडच्या अॅडलेड ओव्हल मैदानावर रंगणार आहे. दोन्ही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता खेळवले जाणार असून त्यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल.
सेमीफायनलचं वेळापत्रक
- पहिली सेमीफायनलची मॅच पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड 9 नोव्हेंबर दुपारी 1.30 सिडनी क्रिकेट स्टेडियम
- दुसरी सेमीफायनलची मॅच भारत विरुद्ध इंग्लंड 10 नोव्हेंबर दुपारी 1.30 अॅडलेड ओव्हल क्रिकेट स्टेडियम