येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापुरातील मागास समाज सेवा मंडळ, नेहरूनगर या संस्थेचे सचिव मोहन चव्हाण यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुली, पत्नी, सुना, नातवंडे असा त्यांचा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या नेहरूनगर येथील राहत्या घरापासून उद्या सकाळी ११.३० वाजता निघणार आहे. बंजारा स्मशानभूमी प्रतापनगर रोड येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. माजी नगरसेविका अश्विनी चव्हाण यांचे ते वडील होत. तसेच संस्था संचलित सर्व शाखांना उद्या श्रद्धांजली वाहून सुट्टी जाहीर करण्यात यावी. असे संस्थेच्या वतीने कळवण्यात आले आहे.