येस न्युज मराठी नेटवर्क : निवडणूक आयोगाने Election Commission शिवसेना आणि शिंदे गटातील पक्ष चिन्हाबाबत काल निर्णय दिला आहे. आयोगाने तात्पुरते शिवसेनेची निशाणी गोठवली आहे. दोन्ही गटांना शिवसेना नावही आता वापरता येणार नाही. १० ऑक्टोबरपर्यंत दोन्ही गटाला नवीन चिन्हाचा पर्याय द्यावा लागणार आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे ठाकरे गटात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाने अंतरिम आदेश पारित केला आहे.
विजय शिवतारे यांची प्रतिक्रिया आयोगाने सांगितले की, अंधेरी पूर्व जागेच्या पोटनिवडणुकीत दोन्ही गटांपैकी एकालाही धनुष्यबाण चिन्ह वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. यानंतर विविध राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. महविकास आघाडी सरकारकडून याला जबाबदार भारतीय जनता पक्ष असल्याचे वक्तव्य केलं जात आहे. यावर शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले की, या सर्व बाबीला जबाबदार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हेच आहे. 2014 पासून शिवसेना संपवण्याची व्ह्यूरचना आखत आहे, आणि ते आत्ता याच्यात यशस्वी झाले आहे. असे यावेळी शिवतारे म्हणाले आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सध्याच्या घडीला 197 निवडणूक चिन्ह उपलब्ध आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाला यापैकी तीन चिन्हाचा पर्याय दिला जावू शकतो. आता दोन्ही गट कोणते चिन्ह घेतात हे सोमवारी समोर येणार आहे. दोन्ही त्यांना हवे असल्यास, त्यांच्या मूळ पक्षाशी जोडणारे चिन्ह निवडू शकतात. पोटनिवडणुकांसाठी दोन्ही गटांना 10 ऑक्टोबर दुपारी 1 वाजेपर्यंत हे सादर करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.