• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गावांमध्ये स्वच्छतेच्या सातत्यासाठी सरपंचांनी जनजागृती करावी – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

Yes News Marathi by Yes News Marathi
September 29, 2022
in मुख्य बातमी
0
गावांमध्ये स्वच्छतेच्या सातत्यासाठी सरपंचांनी जनजागृती करावी – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
0
SHARES
0
VIEWS

‘स्वच्छता ही सेवा’ अभियानअंतर्गत सरपंच संवाद

मुंबई : गावांमध्ये स्वच्छतेचे सातत्य कायम राहावे, ग्रामस्थांचे आरोग्य सुधारावे यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबाला स्वच्छतेचे महत्व पटणे आवश्यक आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी सरपंचांनी सक्रिय पुढाकार घेतल्यास गावाचा विकास अधिक गतीमान होवू शकतो, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

        दि.१५ सप्टेंबर ते दि. २ ऑक्टोबर या कालावधीत 'स्वच्छता ही सेवा' अभियानाचे आयोजन केंद्र व राज्य शासनाच्यावतीने करण्यात आले आहे. या  अभियानात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली "स्वच्छता के लिए एकजुट भारत' मोहिमेअंतर्गत सरपंच संवादाचे ऑनलाईन प्रणालीव्दारे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्यातील प्रत्येक तालुका पंचायत समिती कार्यालयातून संबधित तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच, पंचायत समितीचे पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

        पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री  पाटील म्हणाले, "स्वच्छता ही सेवा" या उपक्रमांतर्गत गावागावांमध्ये स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करण्यात यावी. गावातील कचराकुंडया व असुरक्षित ठिकाणांची साफसफाई, कचरा स्त्रोतांच्या ठिकाणी  सुका व ओला कचरा वेगळे करण्यासाठी जनजागृती उपक्रम, श्रमदान यासारखे उपक्रम घ्यावेत. कचरा संकलन आणि विलगीकरण करण्यासाठी केंद्राची निर्मिती, प्लॅस्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन, एकल प्लॅस्टिक वापराच्या (SUP) दुष्परिणामांबद्दल सभेचे आयोजन करावे. पाणवठ्याजवळील परिसर स्वच्छ ठेवून त्यांच्या सभोवताली वृक्षारोपण करणे, यासारखे विविध उपक्रम सरपंचानी आयोजित करावेत, असे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

        ग्रामपंचायती हागणदारीमुक्त अधिक घोषित करण्यासाठी प्रयत्न करून दि २ ऑक्टोबर २०२२ रोजी स्वच्छतेची प्रतिज्ञा घ्यावी, दि २ ऑक्टोबर २०२२ रोजी स्वच्छ भारत दिवस निमित्ताने ग्रामसभांचे आयोजन करुन हागणदारी मुक्त अधिक (ODF Plus) अंतर्गत विविध घटकांची कामे पूर्ण झालेल्या गावांचे ODF Plus अंतर्गत ठराव घ्यावेत, अशा सूचनाही पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पाटील यांनी  दिल्या.

        गतवर्षात केंद्र शासनाने निश्चित करून दिलेल्या विविध अभियान अंतर्गत देशस्तरावरील १ आणि पश्चिम विभागीय राज्यामध्ये विविध ०६ पारितोषिके राज्याला प्राप्त झाली आहेत. तसेच स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण) २०२१ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हयाला पश्चिम विभागीय राज्यामध्ये द्वितिय क्रमांक प्राप्त झाला आहे. ही सर्व पारितोषिके सरपंचांनी स्वच्छता मोहिमेला दिलेल्या नेतृत्वामुळे असल्याचे नमूद करून मंत्री गुलाबराव पाटील यांनी  या सर्वांचे अभिनंदन केले.

        सद्यस्थितीत राज्यात ३ हजार ८८६ गावे हागणदारीमुक्त अधिक (ODF PLUS) म्हणून गावांनी ग्रामसभेमध्ये ठराव पारित करुन सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या स्वाक्षरीने जाहीर केली आहेत. यामध्ये २ हजार ९८० गावे थ्री स्टार (मॉडेल) या प्रवर्गामध्ये जाहीर केली आहेत. त्याबदल मंत्री श्री. पाटील यांनी सरपंचांचे अभिनंदन केले.

        सरपंच संवादामध्ये औरंगाबाद, नांदगाव, रोहा, वाशीम, वाळवा, कोरेगाव, ब्रम्हपुरी या तालुक्यातील सरपंचांनी उपस्थित केलेल्या स्वच्छतेच्या व जल जीवन अभियानासंदर्भातील विविध मुद्यांवर मंत्री पाटील यांनी  मार्गदर्शन केले. 
Previous Post

तंबाखू आणि एडसबाबत जनजागृती करा – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

Next Post

शौर्यदिनानिमित्त वीरपत्नी, वीर माता, वीर पिता, शौर्य पदकधारकांचा सन्मान

Related Posts

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!
मुख्य बातमी

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!
मुख्य बातमी

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
Next Post
शौर्यदिनानिमित्त वीरपत्नी, वीर माता, वीर पिता, शौर्य पदकधारकांचा सन्मान

शौर्यदिनानिमित्त वीरपत्नी, वीर माता, वीर पिता, शौर्य पदकधारकांचा सन्मान

ताज्या बातम्या

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026