येस न्युज मराठी नेटवर्क : शेतकरी तसेच मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या क्षेत्रीय मराठा फाउंडेशनच्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी शिवाजी सुरवसे यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. विजय मोहिते (ठाणे) यांनी शिवाजी सुरवसे यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात पार पडली .यावेळी संघटनेतील शेतकरी नेते माणिक कदम, रवी तिखंडे ,ज्ञानेश्वर चौरे ,ताई जगताप, डॉक्टर बाळासाहेब शितोळे, माधव जगताप ,देवदत्त पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते. नियुक्तीपूर्वी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत माधव जगताप आणि शिवाजी सुरवसे यांनी केले. प्राध्यापक विजय मोहिते यांनी संघटना स्थापनेबाबतचा आपला उद्देश स्पष्ट केला. राज्यातील सर्व जिल्ह्यात या संघटनेचे काम सुरू आहे .शेतकरी आणि मराठा समाजाचे प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने या संघटनेची स्थापना केल्याचे प्राध्यापक विजय मोहिते यांनी सांगितले. यावेळी माणिक कदम यांनी शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची कशी वाट लागत आहे आणि तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांसाठी किती छान योजना आणल्या आहेत. महाराष्ट्राने तेलंगणाचे अनुकरण करावे आहे असे मत व्यक्त केले. आजवर पत्रकारितेच्या माध्यमातून विविध प्रश्नांवर आवाज उठवत आहे .आता संघटनेच्या माध्यमातून देखील विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन शिवाजी सुरवसे यांनी दिले.