रायपूर : छत्तीसगड येथे झालेल्या पश्चिम विभागीय जूनियर मैदानी स्पर्धेत ज.रा. चंडक प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय बाळेची विद्यार्थिनी कुमारी अश्विनी शिंपले ही तीन किलोमीटर रेस वॉकिंग मध्ये ब्रांझ पदक मिळवले. त्यानिमित्त संस्थेचे अध्यक्षा निर्मला ठोकळ व उपाध्यक्ष सचिन ठोकळ यांनी व प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक प्रमोदजी हिंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत अश्विनीचा सत्कार करून नोव्हेंबर मध्ये आसाम गुवाहाटी येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी प्रमुख पाहुणे हिंगे यांनी सर्व विद्यार्थ्यांना खेळामुळे कशा पद्धतीने करिअर घडते व आपल्या आरोग्य चांगले राहतो त्याचे महत्त्व सांगितले व अश्विनी सारखे आपणही नेहमी सराव करून आपलं आपल्या कुटुंबाचं शाळेचं जिल्ह्याचं राज्याचं नाव लौकिक करावा असे सांगून शुभेच्छा दिल्या. त्यावेळी कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्षा निर्मलाताई ठोकळ, उपाध्यक्ष सचिन भैय्या ठोकळ, पर्यवेक्षक उदय जाधव क्रीडा शिक्षक डी.एस.गुरव व एम.जी मुळे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुळे यांनी केले तर आभार पर्यवेक्षक उदय जाधव यांनी मानले.