सोलापूर : ईश्वराने दिव्यांगांना एक अधिकची सुप्त शक्ती दिली आहे. त्या जोरावर दिव्यांग व्यक्तींनी सर्व क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केली आहे असे प्रतिपादन अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव यांनी केले. रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मूकबधिर विद्यालयात गणेशपूजनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. उदाहरणादाखल त्यांनी संशोधक “स्टीफन हॉकिंन्स आणि अरुणीमा सिन्हा ” यांची जीवनगाथा रंजकपणे सांगितली. प्रारंभी मान्यवरांचे आणि उपस्थितांचे स्वागत आणि शाळेची माहिती मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांनी सांगितली. तर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार शाळेचे सचिव सुनील दावडा यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमास शाळेचे सचिव रोटेरियन सुनील दावडा, दौलत सीताफळे, जान्हवी माखिजा, धनश्री केळकर, पिटाळकर, चंदनशिवे, सातपुते, बागवान, बेनुरे, चिंचोळे, पाटील, मदभावी, गडगे, बसाते, ठाकर, लोखंडे, थोरात, पवार, आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशेष शिक्षिका रेणुका पसपुलें यांनी केले तर आभार सचिव सुनील दावडा यांनी मानले.