सोलापूर -जिल्ह्यातील ९५२ ग्रामपंचायतीनी अभिलेख वर्गीकरण करणेत आले असल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे या्मुनी दिली.
आझादीका अमृत महोत्सव अंतर्गत ही मोहिम घेणेत आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे मार्गदर्शनानुसार ग्रामपंचायत विभागामध्ये विविध उपक्रम राबविण्यासाठी विशेष मोहीम दि. १२ आॅगष्ट रोजी परिपत्रक काढून त्या परिपत्रकाप्रमाणे दिनांक १३ ते १७ आॅगष्ट २०२२ या कालावधीत ही मोहिम राबविणेत आली.
या मघ्ये कार्यालय स्वच्छता मोहिम, अभिलेख वर्गीकरण वृक्षरोपण, पर्यावरण शपथ, प्रभातफेरी, शालेय स्पर्धा किशोरी मेळावे सांस्कृतिक कार्यक्रम/देशभक्तीपर कार्यक्रम तसेच गावपातळीवर ग्रामपंचायतीवर विद्युत रोशनाई इत्यादी उपक्रम राबविण्यात आले त्यामध्ये १०१९ ग्रामपंचायतीची स्वच्छता, व अभिलेख वर्गीकरण कार्यक्रम हे कार्यक्रम युध्द पातळीवर घेण्यात आले हा उपक्रम हर घर झेंडा या कार्यक्रमाबरोबरच राबविला गेला.
गटविकास अधिकारी यांचे पर्यवेक्षणाखाली ही मोहिम राबविणेत आली.या मोहिमे अंतर्गत उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे यावे ू नियोजन केले. त्याप्रमाणे सर्व गटविकास अधिकारी, सर्व विस्तारअधिकारी, पंचायत, ग्रामसेवक यांनी अभियानामध्ये मेहनत घेवून १०१९ पैकी सर्व ग्रामपंचायती स्वच्छ केल्या. त्याप्रमाणेच अभिलेख वर्गीकरण करणे है अत्यंत जिकरीचे काम असतांना देखील १०१९ पैकी ९५२ ग्रामपंचायतीचे अभिलेख त्या कालावधीत करण्यात आले तसेच सर्व अभियानाचे फोटो mahaamrut.org या वेबसाईट वर उपलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
पुढील टप्प्यामध्ये अभिलेख वर्गीकरण झालेल्या सर्व ग्रामपंचायतीची तपासणी विस्तार अधिकाज्या मार्फत करण्यात येणार आहेत असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांनी सांगितले. सदर अभियान व्यवस्थित राबविल्या बद्दल विस्तार अधिकारी पंचायत, ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांचे अभिनंदन उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी केले आहे.
स्वच्छ सुंदर ग्रामपंचायत मोहिम राबविणार – सिईओ दिलीप स्वामी
……………
पशुचिकित्सा इमारती सुशोभिकरण च्या धर्तीवर ग्रामपंचायती सुशोभिकरण मोहिम राबविणेत येणार असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. स्वच्छ सुंदर ग्रामपंचायत कार्यालयच शौचालय सुविधा, परिसराची स्वच्छता, अभिलेख वर्गीकरण, सार्वजनिक शौचालय सुविघा, रंगरंगोटी, याबाबत सविस्तर सुचना ग्रामपंचायतींना देणेत येणार आहे. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
सहभाग न दाखवणारे ग्रामपंचायतींना नोटीसा देणार – उप मुकाअ शेळकंदे
………..
ज्या ग्रामपंचातींनी अभिलेख वर्गीकरण केले नाही असा ग्रामपंचायतींना कारणे दाखवा नोटीसा देणेत येणार आहेत. त्यांना सात दिवसाची मुदत देणेत येणार आहे. अभिलेख वर्गीकरणा मुळे शिस्त निर्माण होते. ग्रामपंचायतींनी अभिलेख वर्गीकरण ही निरंतर प्रक्रिया आहे. या मध्ये हालगर्जीपणा करून नसे असेही उप मुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे यांनी सांगितले.