मुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येऊन विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधकांनी केली. तसंच यावेळी शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
महाविकास आघाडीतील नेत्यांनी यावेळी शिंदे गटातील आमदारांना डिवचलं. सभागृहात जाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील आमदार जवळ येताच ’50 खोके, एकदम ओक्के’, ‘आले रे आले गद्दार आले’, अशा घोषणा विरोधकांनी दिल्या.