सोलापूर – येथील शरदचंद्र पवार प्रशालेत लोकमान्य टिळक यांची पु्यतिथी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रशालेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजी विद्यालय कारी चे मुख्याध्यापक महावीर भुसारे व शरदचंद्र पवार महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य पाटोळे यांच्या प्रमुख उपसथितीत प्रतिमा पूजन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून या दोन्ही महान व्यक्तिमत्त्वाचे चरित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला तर सहशिक्षक नितीन मिस्किन यांनी या दोन वंदनीय व्यक्तिमत्त्वाच्या कार्याला आपल्या मनोगतातून उजाळा दिला.प्रशालेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांनी अध्यक्षीय मनोगतातून लोकमान्य टिळक यांची देशभक्ती आणि स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेले बलिदान आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलेले समाजप्रबोधन याविषयी माहिती दिली.
कु. श्रावणी देवकते हिने सूत्रसंचालन तर चि.दिग्विजय माने याने प्रास्ताविक केले तर कु.प्रिती जाधव हिने आभार मानले. याप्रसंगी प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.