यंदा संपूर्ण भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असून त्यानिमित्त शासनाच्या वतीने ‘हर घर तिरंगा ‘ हा उपक्रम राबविण्यात येत आहे . या उद्देशाने पद्मशाली शिक्षण संस्था संचलित भू .म.पुल्ली कन्या प्रशालेच्या वतीने पस्तीस फूट लांबीचा भव्य तिरंगा तयार करण्यात आला आहे .शालेय परिसरात आणि विणकर बागेत शनिवारी विद्यार्थीनीच्या हस्ते हा तिरंगा प्रदर्शित करण्यात आला .संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ गड्डम, उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी , सचिव दशरथ गोप , सहसचिवा संगीता इंदापुरे , खजिनदार नागनाथ गंजी , सन्माननीय विश्वस्त यांच्या प्रेरणेने हा उपक्रम राबविला जात आहे .
तिरंगा राष्ट्राभिमानाचे प्रतीक असून विद्यार्थी, पालक आणि शहरातील सर्व नागरिकांनी या भव्य तिरंग्याची प्रेरणा घेऊन आपल्या घरावर तिरंगा फडकवीत संपूर्ण शहर तिरंगामय करणे ही अपेक्षा असल्याचे मत मुख्याध्यापिका गीता सादूल यांनी यावेळी व्यक्त केले .
ह्या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले,पर्यवेक्षिका प्रणिता सामल, उमा कोटा , रमाकांत मामड्याल, सुभाष जाधव , आशिष मिसाळ परमेश्वर बाबळसुरे , बाळासाहेब गंभीरे , हरिप्रसाद बंडी , .नितीन मिरजकर , सचिन मुसळे तसेच प्रशालेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.