येस न्युज मराठी नेटवर्क : काँग्रेस मधून शिवसेनेत डेरे दाखल झालेले सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे गेल्या पाच वर्षापासून चर्चेत आहेत. शहर मध्य विधानसभा मतदारसंघात डावल्यामुळे त्यांनी शिवसेनेच्या विरोधात बंड पुकारले. नंतर शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शरद पवारांच्या आदेशानुसार राष्ट्रवादीत प्रवेश केला .एवढेच नव्हे तर शरद पवारांनी सोलापूर महापालिकेची सर्व जबाबदारी महेश कोठे यांच्यावर सोपवल्याचे जाहीरपणे सांगितले. त्यामुळे कोठे यांची गाडी फार्मात होती परंतु महाविकास आघाडी सरकार पडले आणि शिवसेनेच्या विरोधात जाऊन एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात भाजपा सोबत सरकार स्थापन केले. त्यामुळे राज्यभरातील सर्वच पक्षाचे राजकारण बदलले आहे. सोलापुरात देखील शिवसेनेमध्ये उभी फूट पडत आहे असे दिसते काहीजणांनी जाहीरपणे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. तर काहीजण अजूनही चोरी चोरी चुपके चुपके अशा पद्धतीने शिंदे गटाला मिळत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सोलापूर दौऱ्यामध्ये महेश कोठे आणि त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी एकत्रितपणे एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता कोठे राष्ट्रवादी सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळतील का याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. कोठे शिंदे यांच्या समवेत गेले तर पुन्हा सोलापुरातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेने मधील पदाधिकाऱ्यांची फाटा फूट होणारे निश्चित. मी राष्ट्रवादी मध्येच आहे असं जाहीर वक्तव्य महेश कोठे यांनी केल्या त्यामुळे काय शिस्तय याबाबत अंदाज बांधणे पुन्हा अवघड बनले आहे.