येस न्युज नेटवर्क : राज्यसभेसाठी सहावा उमेदवार शिवसेनेचाच असेल. संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेची उमेदवारी स्विकारुन निवडणूक लढवावी, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना संभाजीराजे छत्रपतींना राज्यसभेसाठी उमेदवारी देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अशातच आज पहिल्यांदाच यासंदर्भात संजय राऊतांनी उघडपणे भाष्य केलं. त्यामुळे आता संभाजीराजे छत्रपती शिवसेनेनं दिलेली ऑफिर स्विकारणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तोच पक्ष पुढे नेईल. फक्त खास राज्यसभा निवडणुकांवरच चर्चा झालेली नाही. इतर अनेक विषयांवरही चर्चा झाली. आजच्या बैठकीला इतरही काही आमदार होते. विनायक राऊतही होते. अनेक विषयांवर चर्चा सुरु आहे.”