येस न्युज नेटवर्क : महाराष्ट्रात भोंग्यावरुन राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. योगी-भोगीबाबत मतपरिवर्तन अचानक कस झालं? असा सवाल करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज यांचं मतपरिवर्तन हा पीएचडीचा विषय आहे, असा खोचक टोलाही त्यांनी माध्यमांशी बोलताना लावला आहे.
व्यस्त कामकाजामुळे मुंबई सत्र न्यायालयाच्या वतीनं गेल्या सुनावतीच स्पष्ट करण्यात आलं होतं की, शक्य झाल्यासच आम्ही शुक्रवारी ही सुनावणी घेऊ. त्यानुसार, आज याचिकाकर्त्या राणा दाम्पत्याच्या वकिलांनी युक्तीवाद केला. त्यांनी न्यायालयाला विनंती केली की, याचिकाकर्त्य दाम्पत्य निवडून आलेलं आमदार आणि खासदार आहेत. हे प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी आज थोडा वेळ का होईना न्यायालयाला शक्य असल्यास ते युक्तीवाद करण्यास तयार आहेत. परंतु, न्यायालयाच्या आजच्या वेळापत्रकानुसार, इतर महत्त्वाची प्रकरणंही सुनावणीसाठी आहेत. न्यायालयाकडे आज जराही वेळ नाही, असं न्यायाधीश राहुल रोकडे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी घेण्यात येणार आहे.