बीड : अभिनेते, निसर्गप्रेमी सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या बीड मधील सह्याद्री देवराईला (Sahyadri Devrai) आग लागली आहे. आगीमुळे दोन एकरवरील झाडाचं नुकसान झालं आहे. दुपारच्या सुमारास ही आग लागली आहे. तब्बल दोन तासांनंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आग विझवण्यात यश मिळालं आहे.
सह्याद्री देवराईला भीषण आग लागली असल्याचे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाऱ्यामुळे आग जास्त पसरत गेली. तब्बल दोन तासानंतर ही आग विझवण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश मिळालं आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पालवन गावाजवळ 25 एकर सह्याद्री देवराईचा परिसर आहे. या ठिकाणी सर्व देशी झाडांची लागवड करण्यात आलेली आहे. आता वड, पिंपळ आणि लिंबाचे झाड जळून खाक झाले आहे. आगीत तब्बल दोन एकरचा परिसर जळून खाक झाला आहे.