सोलापूर : मागासवर्गीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित केंद्रीय निवासी माध्यमिक विद्यालय मंद्रूप येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान याचे लोकार्पण व उद्घाटन सोहळा पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तालुका उत्तर सोलापूरचे सभापती भडकुंबे, अक्कलकोटचे माजी सभापती सिद्धार्थ गायकवाड, प्रहार संघटनेचे अध्यक्ष सिद्धू काळे, दक्षिण सोलापूर बहुजन हक्क अभियानचे सचिन फडतरे, जिल्हाध्यक्ष भटक्या विमुक्त जाती सेल काँग्रेसचे सुरेश राठोड, गुळवंचीचे माजी सरपंच मोतीराम पवार, गुळवंचीचे सरपंच सागर राठोड, आरके कन्स्ट्रक्शनचे मोतीलाल राठोड, बहुजन समाज पार्टीचे महासचिव गुरुदास गायकवाड, हागलुरचे सरपंच श्रीकांत मगर, आप्पासाहेब वाघमारे, मनोज निर्मले काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम चव्हाण, मंद्रूपचे पंचायत समिती सदस्य अमृता चव्हाण, बाळू काका चव्हाण, बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष खंदारे, माळकोठा गावचे ग्रामपंचायत सदस्य आनंद कुमार थोरात प्रगतशील बागायतदार नितीन मूळ गुंडे, महाराष्ट्र राज्य स्टेटचे कोच व औरंगाबादचे क्रीडा अधिकारी गणेश पवार, मोहोळ तालुक्याचे आरोग्य निरीक्षक निर्मल पवार, प्रहार संघटनेचे तालुका उपाध्यक्ष हाजी मलंग नदाफ यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिरामण पवार यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष मानसिंग पवार, संस्थेचे सचिव विशाल पवार, संस्थेचे खजिनदार आकाश पवार सर तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक विरपे व प्रशालेतील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे आभार व्यक्त केले तसेच प्रशालेत उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान हे प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांकरीता खुले करून देण्यात आले आहे.