बंगळुरू : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा यांची नात सौंदर्या हिने गळफास लावून आत्महत्या केली आहे. बंगळुरूत ही घटना घडली. 30 वर्षीय सौंदर्या ही बंगळुरूच्या एमसएस रमैया रुग्णालयात डॉक्टर होती. येथील माऊंट कार्मेल कॉलेजजवळील एका अपार्टमेंटमध्ये सौंदर्या ही तिचा पती आणि सहा महिन्याच्या बाळासोबत राहत होती. येडियुरप्पा यांच्या कार्यालयाने सौंदर्याने आत्महत्या केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच तिचे पार्थिव बॉरिंग अँड लेडी कर्जन रुग्णालयात पोस्टमार्टेमसाठी नेण्यात आलं आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला आहे. सौंदर्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलं नाही. या संदर्भात पोलीस तपास करत आहेत. मात्र, सौंदर्याने आत्महत्या केली असावी, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे.