येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूरच्या बालाजी आम्हांस या कंपनीने तब्बल एक कोटीहून अधिक निधी खर्च करत आपल्या सीएसआर निधीमधून शहरातील रुपाभवानी स्मशानभूमी येथे नवीन विद्युत दाहिनी बसवून या ठिकाणचा परिसर रमणीय बनला आहे. एवढ्या कमी पैशांमध्ये या स्मशानभूमीचा कायापालट करण्यात आला असून आता देखभाल करीत हा परिसर मेंटेन ठेवणे ही आता महापालिकेची जबाबदारी वाढली आहे. 25000 स्क्वेअर फिट जागेमध्ये बालाजी अमाईन्स ने नवीन विद्युत दाहिनी बसविली असून त्यामध्ये दोन मोठे शेड बांधले आहेत नागरिकांना बसण्यासाठी मार्बल चे 17 बाकड्यांची अत्यंत सुंदर व्यवस्था करण्यात आली आहे .फाईव्ह स्टार हॉटेल प्रमाणेच याठिकाणी टॉयलेट आणि बाथरूमची देखील सुविधा करण्यात आली आहे. परिसरात आकर्षक पद्धतीने झाडे लावून सुशोभिकरण करण्यात आला आहे विद्युत दाहिनी, विद्युत दाहिनी चे मोठे शेड, श्रद्धांजली सभाग्रह, महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र हॅन्ड वॉश सेंटर, संपूर्ण बंदिस्त परिसर आणि गेट तसेच लाईटची सुविधा आणि रंगरंगोटी करून हा ही स्मशानभूमी सुशोभित करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त पी शिवशंकर उपायुक्त धनराज पांडे यांचा संदीप कारंजे यांनी या प्रकल्पासाठी सहकार्य केले. दरवर्षी या ठिकाणी कोरोनाच्या डेड बॉडी येत असताना अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये वास्तुविशारद मनोज मर्दा तांत्रिक सल्लागार प्रमोद जोशी कॉन्ट्रॅक्टर सिद्धाराम हलदी यांनी मोलाची साथ दिली आणि कमीत कमी निधी मध्ये एवढे मोठे सुंदर आणि आदर्शवत काम केले असे मत बालाजी अमाईन्स चे राम रेड्डी यांनी व्यक्त केले. मनोज मर्दा यांनी देखील या कामाची माहिती दिली.