सोलापूर : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांचे पंढरपूर येथे आगमन झाल्यावर महापौर श्रीकांचना यन्नम यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.तर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग राज्य मंत्री जनरल व्ही.के सिंहजी याचं स्वागत सभागृह नेते शिवानंद पाटील यांनी केले. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस खासदार डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामी, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, सभागृह नेते शिवानंद पाटील,शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, लक्ष्मणराव ढोबळे, परिवहन सभापती जय साळुंखे,माजी सभागृह नेते व नगरसेवक संजय कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.