पंढरपूर/शिवाजी सुरवसे : व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंढरपुरात कोणत्या कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करणार आहेत हे आपण पाहूया. संत ज्ञानेश्वर पालखी महामार्ग अंतर्गत मोहोळ ते वाखरी या 44 किलोमीटर रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येत असून याची किंमत 1438 कोटी आहे. वाखरी ते धर्मपुरी या एकूण 40 कीलोमीटर रत्यासाठी 1154 कोटी खर्च करण्यात येत आहेत . धर्मपुरी ते लोणंद या 49 किलोमीटर मार्गासाठी 1412 कोटी खर्च होणार आहेत. लोणंद ते दिवे घाट या 54 किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी 1710 कोटी खर्च होणार आहेत. संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग अंतर्गत पाटस ते बारामती या रस्त्याच्या या 41 किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी 1343 कोटी तर बारामती ते इंदापूर या 42 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी 1471 कोटींचा खर्च होणार आहे . इंदापूर ते तोंडले या 40 किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी सोळाशे कोटी रुपये खर्च होणार आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत होणाऱ्या वरील सर्व कामांचे आज पंतप्रधान मोदी भूमिपूजन करणार आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत पूर्ण झालेल्या पुढील कामांचे लोकार्पण या कार्यक्रमात होणार आहे. म्हसवड- पिलव -पंढरपूर या 53 किलोमीटर रस्त्यासाठी 263 कोटी रुपये खर्च करून उन्नती करण्यात आली आहे कुर्डूवाडी ते पंढरपूर या 48 किलोमीटर रस्त्यासाठी 212 कोटी रुपये खर्च करून तो विकसित करण्यात आला आहे. पंढरपूर ते सांगोला या 31 किलोमीटर साठी 177 कोटी रुपये खर्च करून हा रस्ता विकसित केला आहे टेंभुर्णी ते पंढरपूर या छत्तीस किलोमीटर लांबीच्या या रस्त्यासाठी 112 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पंढरपूर- -मंगळवेढा -उमदी या 54 किलोमीटर रस्त्यासाठी 422 कोटी रुपये खर्च करून हा रस्ता विकसित केला आहे . त्यामुळे आज पंढरपुरात 12294 कोटी रुपये किमतीच्या आणि 574 किलोमीटर लांब असलेल्या तेरा महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा होत आहे