सोलापूर : सर्व मतदान केंद्रावर दि. १३ व १४ नोव्हेंबर, २०२१ व दि. २७ व २८ नोव्हेंबर, २०२१ रोजीच्या विशेष मोहिमे दिवशी फॉर्म स्वीकारण्यासाठी BLO यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. विशेष मोहिमे दरम्यान दिव्यांग मतदार यांचा शोध घेणे व त्यांना मतदार यादीत चिन्हाकित करणे. तसेच तृतीयपंथी मतदाराचा शोध घेऊन त्यांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी विशेष मतदार अभियान आयोजित केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी.शिवशंकर, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी दिली.
मयत मतदार – तालुका स्तरावर नगर परिषद, नगर पालिका व ग्रामीण भागात ग्रामसेवक यांच्या सही शिक्याने मयत मतदाराच्या याद्या प्राप्त झाल्या असून, शहरी भागामध्ये महानगरपालिका यांचेकडून मयत मतदाराच्या याद्या प्राप्त करून घेण्यात येत आहे.
ग्रामसभा -दि १६ नोव्हेंबर, २०२१ रोजी तालुका निहाय ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले असून सदर ग्रामसभेमध्ये मतदार यादीचे वाचन होणार आहे. तसेच मयत, स्थलांतरित, आढळ न होणारे मतदार यांच्या याद्याचे वाचन होणार आहे. तालुका निहाय प्राप्त मयत मतदार याद्याचे वाचन दि १६ नोव्हेंबर, २०२१ रोजी ग्रामसभेमध्ये करण्यात येवून सदर मतदाराची नावे वगळण्यात येणार आहेत.
मतदारांना आवाहन – दि ०१.११.२०२१ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली असून, ज्या नागरिकांनी मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज केला होता त्यांना आव्हान करण्यात येते की, संबंधित BLO. तहसील कार्यालय व उप विभागीय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये प्रारूप मतदार यादी नावे पाहण्यासाठी उपलब्ध असून, त्यांनी आपले नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट असल्याची खात्री करावी. तसेच जर त्यांचे नाव मतदार यादीमध्ये नसलेस सबंधित तहसील कार्यालयाकडे जावून सदर अर्जाची चौकशी करावी. तदनंतरच जर आपला अर्ज नामंजूर करण्यात आला असेल तर नव्याने नमुना अर्ज क्र ६ भरावा.