सोलापूर – भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत. आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता संवाद कार्यक्रमाचे आयोजन व सर्व सदस्यांसमवेत दि.२९ ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता शांतीसागर मंगल कार्यालय जुने एम्प्लॉयमेंट चौक येथे महत्वाच्या विषयावर चर्चा व विचार विनिमय करण्यासाठी बैठक आयोजित केली आहे. तरी महापालिकेतील सर्व सदस्यांनी या बैठकीस सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन शहराध्यक्ष विक्रम देशमुख आणि सभागृह नेते शिवानंद पाटील यांनी सांगितले आहे.