सोलापूर – महापालिकेच्या वतीने आज एकूण 274 लोकांनी स्ट्रीट बझार येथील ऑफलाईन लिलाव मध्ये भाग घेतला.या लिलावप्रक्रिया मध्ये कागदपत्रांची छाननी करून मग लिलावस सुरुवात करण्यात आली. सर्वच्या सर्व गाळे अपेक्षित रकमेपेक्षा जास्त रकमेला बोली लावून घेतले.प्रथम दिव्यांगासाठी असणाऱ्या गाळ्याचा लिलाव पुकारला गेला.एकूण 20 गाळ्यांपैकी 4 गाळे महिलांनी जास्तीत जास्त बोली लावून भाड्याने घेतले. या लिलावासाठीची बेसिक किंमत लक्षात घेता एकूण 2,24,735/- इतके उत्पन्न दरमहा अपेक्षित होते. पण आजच्या लिलावातून आता 5,55,100/- इतके उत्पन्न दरमहा मिळेल.या लिलावातून महापालिकेला ऐकून 5,55,100/- इतके उत्पन्न दरमहा महापालिकेला मिळेल.