मुबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावानं खंडणी मागणाऱ्या टोळीला, मुंबईतल्या मालवणी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. धक्कादायक बाब म्हणजे, अटक करण्यात आलेल्यांमध्ये मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते आणि त्यांच्या चालकाचा समावेश आहे.
अटक करणाऱ्यात आलेल्यांमध्ये दिग्दर्शक मिलन वर्मा, निर्माता युवराज बोराडे आणि चालक सागर सोलंकर यांचा समावेश आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणी एका मराठी अभिनेत्रीला देखील नोटीस धाडली आहे. ही अभिनेत्री मनसेची कार्यकर्ता असल्याचं बोललं जात आहे. आरोपींनी मढ परिरातील एका बंगल्याच्या सुरक्षारक्षकाला मारहाण केली होती आणि या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल केला. सुरक्षारक्षकानं केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे.