सोलापूर : लोकमंगल फाउंडेशन च्या वतीने यंदाच्या वर्षी 21 नोव्हेंबर रोजी सोलापूर शहरातील नेहरू नगर जवळ असलेल्या शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या मैदानावर सामुदायिक विवाह सोहळा होणार असल्याची माहिती संचालक अविनाश महागावकर यांनी दिली लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळ्याचे हे सोळावे वर्ष असून आजवर 2981 जोडप्यांचे विवाह संपन्न झाले आहेत कोरूना चे नियम पळून हा विवाह सोहळा होणार असून ज्यांना या विवाह सोहळ्यामध्ये आपला विवाह करावयाचा आहे त्यांनी 15 नोव्हेंबर पर्यंत लोकमंगल फाउंडेशन च्या कार्यालयात नाव नोंदणी करावी असे आवाहन महागावकर यांनी केले आहे. यावेळी शशी थोरात उपस्थित होते.
यंदाच्या वर्षीचा लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळा कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून येत्या २१ नोव्हेंबर २०२१ रोजी गोरज मुहूर्तावर शिवाजी अध्यापक विद्यालय (डी.एड.कॉलेज) नेहरू नगर, विजापूर रोड सोलापूर येथील मैदानावर संपन्न होणार आहे. लोकमंगल फाऊंडेशनतर्फे होणा-या या विवाह सोहळयाची पूर्व तयारी करण्यात येत आहे.
लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळयाचे हे 16 वे वर्ष असून आजवर 2981 जोडप्यांचे विवाह संपन्न झाले. यंदाही या सोहळ्यात जास्तीत जास्त जोडप्यांचा विवाह लावण्याचा संकल्प आहे. या सोहळयाला आता एक सामाजिक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. इच्छुकांना या सोहळयाची अधिक माहिती व्हावी. यासाठी सोलापूर शहर आणि जिल्हयात लोकमंगल बॅक, लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था, लोकमंगल साखर कारखाना, लोकमंगल मल्टिस्टेट, लोकमंगल जीवक हॉस्पीटल, आदि ठिकाणी विवाह सोहळा संदर्भातील माहिती केंद्रे उभारण्यात आली आहेत. हा विवाह सोहळा सर्वधर्मीय असल्याने हिंदू, बौध्द, मुस्लीम, जैन, खिश्चन अशा तरूण तरूणींना या सोहळ्यासाठी नाव नोंदणी करता येईल.
या विवाह सोहळयात प्रत्येक वधूवरास विवाहाचे कपडे, व-हाडी मंडळीच्या भोजनाची सोय, मामांकरिता मानाचा आहेर, वधूस मणी मंगळसूत्र व जोडवे देण्यात येतील. ताट, वाटी, ग्लास प्रत्येकी 5 नग, बाळकृष्ण, स्टील हंडा, चहा साखरेचे डब्बे, असे संसारोपयोगी साहित्य दिले जाते. तरी या विवाह सोहळयामध्ये जास्तीत जास्त विवाह इच्छूकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन लोकमंगल फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. नाव नोंदणी सोलापूर येथील लोकमंगल फाऊंडेशनच्या कार्यालयात सुरू आहे. संपर्कासाठी पत्ता लोकमंगल फाऊंडेशनचे ऑफिस ‘अन्नपूर्णा”, 13 अ, सहयाद्री कॉलनी, जुना होटगी नाका, सोलापूर 413003 फोन नंबर 0217- 2322480 मो. नं. 9657709710 नाव नोंदणीची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2021 लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळयात विवाह झालेल्या जोडप्यांस त्यांच्या योग्यतेप्रमाणे लोकमंगल परिवारात नोकरी दिली जाते.