सोलापूर – स्वच्छतेची सुरूवात स्वतच्या घरापासून करा असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द कांबळे यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आॕनलाईनद्वारे सोलापूर जिल्ह्यातील सरपंच यांचेशी संवाद साधला.
भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत शनिवार २५ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी ३ ते ५ या दरम्यान जिल्ह्यातील सर्व सरपंच यांना शाश्वत स्वच्छतेविषयी संवाद साधला.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे , मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी , राज्य पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक रविंद्र शिंदे ,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता ) स्मिता पाटील , जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव , घनकचरा व्यवस्थापन तज्ञ मुकूंद अकुडे आदींनी जिल्ह्यात शाश्वत स्वच्छता , सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन , वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय , प्लास्टिक निर्मूलन आदी विषयी मार्गदर्शन केले. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष दीपाली व्हटे, यशवंती धत्तुरे , प्रशांत दबडे, अधिक्षक सचिन सोनकांबळे, मुकुंद आकुडे उपस्थित होते.
स्वच्छतेची सुरूवात स्वत पासून करा – अध्यक्ष कांबळे
सोलापूर जिल्हयात स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्यासाठी व शाश्वत स्वच्छता टिकून राहणेसाठी लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. आपले गाव शाश्वत स्वच्छतेकडे घेऊन जाण्यासाठी या सर्व उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा. गावाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी ग्रामस्थांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे.
स्वच्छतेत चांगले काम करा रोगराई हटेल- सिईओ स्वामी
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा संधी आहे. तुम्ही स्वच्छ भारत मिशन प्रभावी पणे राबवा. सांडपाणी व घनकचरा झालेस गावात रोगराई राहणार नाही.
दि. १ आॅक्टोबर ते ३१ आक्टोबर या कालावधीत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021 चे आयोजन केंद्र व राज्य शासनाने केले आहे आहे. या कालावधीत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे. सर्वेक्षणात उत्कृष्ठ ठरणारे तालुक्याना सन्मानित करण्यात येणार आहे.उत्कृष्ट काम करणाºया ग्रामपंचायतीची क्रमवारी ठरविण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीअंतर्गत जिल्ह्यातील सर्वेक्षणामध्ये सहभागी असणाºया सर्व गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत झालेल्या सर्वेक्षणाची आकडेवारी ग्राह्य धरली जाणार आहे. यामध्ये हागणदारीमुक्त गावाची पडताळणी, शौचालयांच्या नवीन बांधकामांची पाहणी केली जाणार आहे.
स्वच्छता सेवा उपक्रम राबवा – अतिरिक्त सिईओ संतोष धोत्रे
प्रत्यक्ष पाहणीअंतर्गत सरकारी शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आठवडा बाजार, धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणांतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांची स्वच्छतेविषयक प्रत्यक्ष तसेच आॅनलाईन प्रतिक्रिया नोंदविली जाणार आहे. गावांचे सरपंच, स्वच्छाग्रही, ग्रामपंचायत सदस्य, देखरेख समिती सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा सेविका व शिक्षकांच्या माध्यमातून पाहणी केली जाणार आहे.गावाच्या पाहणीदरम्यान गावाची स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन स्थिती व कचरा व्यवस्थापनासाठी गावपातळीवर राबविण्यात आलेल्या उपक्रमांची पाहणी केली जाईल. त्यासाठी सर्व सरपंचांनी व ग्रामसेवक यांनी सक्रिय सहभाग घ्यावा. गावे अधिक शाश्वत स्वच्छता करण्यासाठी सर्वांनी योगदान देणे आवश्यक आहे. या गावातील महिला बचत गट, सामाजिक क्षेत्रात आघाडीवर असणारे युवा कार्यकर्ते यांचा सहभाग घेऊन चळवळ उभी करावी.सोलापूर जिल्हात सांडपाणी व्यवस्थापनासाठी 40 हजार शौषखड्डे घ्यावयाचे आहेत. कामे पुर्ण करा असे अतिरिक्त सिईओ संतोष धोत्रे यांनी सांगितले.
अध्यक्ष अनिरूध्द कांबळे म्हणाले, सिईओ दिलीप स्वामी यांनी कोरोनाच्या काळात विविध अभियाने राबविली. त्याची दखल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतली. माझे गाव कोरोनामुक्त गाव हे अभियान राज्य स्तरावर राबविणेत आले. सिईओ दिलीप स्वामी यांनी स्वच्छ सुंदर शाळा उपक्रम लोकसहभागातून राबविला. ३ कोटीची कामे लोकसहभागातून होऊ शकतात हे त्यांनी दाखवून दिले. त्याच धर्तीवर आपण जर प्रत्येक कुटूंबाकडे सांडपाणी व्यवस्थापना साठी एक शौषखड्डा घेतला तर गाव डासमुक्त होईल. “ माझे गाव….डास मुक्त गाव “ हे विशेष अभियान होईल. शौषखड्डे मुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढणेस मदत होईल.
सरपंचाचे योगदान महत्व पुर्ण – सचिन जाधव
उत्तर सोलापूर तालुक्यांतील. वडाळा, बार्शी तालुक्यांतील खडकोणी , माढा तालुक्यांतील भेंड चे सरपंच डाॅक्टर दळवी यांनी या मध्ये खुप चांगले काम केले आहे. बरेच सरपंचानी यामध्ये चांगले काम केले आहे. स्थायित्व व सुजलाम अभियान अंतर्गत शौषखड्डे घेणेचे काम चांगले करणारे सरपंच व संपूर्ण जिल्हा परिषद गट करणारे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांचा आपण विशेष गौरव जिल्हा स्तरावर करणार आहोत. खास सन्मान पत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरव करणेत येणार आहे. गाव Odf plus करा. मोबाईलवर Ssg2021 अॅप डाऊनलोड करून सोलापूर जिल्हासाठी प्रतिसाद द्या. गावात प्लॅस्टिक संकलन केंद्र करा. शौचालयाचा वापर करा. असे आवाहन जाधव यांनी केले.