सोलापूर जिल्हयात मोबाईल स्नॅचिंग व मोबाईल चोरी करणारी टोळी सक्रिय झाल्याने, सोलापूर जिल्हयात मोबाईल स्नॅचिंगच्या गुन्हयामध्ये वाढ झाली होती. त्या अनुशंगाने माहिती घेवुन वरीश्ठांनी सदरच्या मोबाईल स्नॅचिंग व मोबाईल चोरी करणा-या टोळीस अटक करून गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेषित केले होते.
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे षाखेकडील पोसई शैलेश खेडकर व पथकातील अंमलदार यांनी सदर गुन्हे कोणी केले असतील, याबाबत माहिती काढली असता, पथकास गोपनिय बातमीदारामार्फत सदरचे गुन्हे टाकळी येथील एका इसमाने त्याचे साथीदारासह केले असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर माहितीच्या अनुशंगाने खात्री केली असता, बातमीप्रमाणे एक इसम चोरी गेलेले मोबाईल व बुलेट मोटारसायकल घेवुन टाकळी ता. दक्षिण सोलापूर येथुन सोलापूर शहर येथे मोबाईल विक्री करीता जात असल्याची खात्री झाली. त्या अनुशंगाने पथकाने वडकबाळ, ता. दक्षिण सोलापूर सापळा लावुन, बातमीतील वर्णनाच्या एका इसमास बुलेट मोटारसायकल व त्याचेकडील मोबाईलसह ताब्यात घेतले. सदर इसमास त्याचेकडे असलेले मोबाईल व बुलेट मोटारसायकल याबाबत विचारपूस केली असता, त्याने सुरूवातीस उडवाउडवीचे उत्तरे दिली, पंरतु त्यास अधिक विष्वासात घेवुन चैकषी केली असता, त्याने त्याचे इतर साथीदारसह सदरचे मोबाईल चोरी केल्याचे सांगितले. त्याचे ताब्यातील बुलेट मोटारसायकल सुध्दा त्याने स्वतः सोलापूर हरातून चोरी केल्याचे सांगितले आहे.
सदर इसमाच्या ताब्यातील विविध कंपन्याचे 22 महागडे मोबाईल व बुलेट मोटारसायकल असा एकुण 3,82,000/- रू. किंमतीचा मुददेमाल पुढील तपासकामी ताब्यात घेतला आहे. सदर इसमाच्या ताब्यात मिळालेले मोबाईल व बुलेट मोटारसायकल याबाबत चैकषी करून खात्री केली असता, खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत.
सोलापूर ग्रामीण – 04 गुन्हे
- सोलापूर तालुका पेालीस ठाणे, गुरनं-753/2021 भादंवि क. 392, 506,34 प्रमाणे.
- सोलापूर तालुका पेालीस ठाणे, गुरनं-754/2021 भादंवि क. 392, 34 प्रमाणे.
- सोलापूर तालुका पेालीस ठाणे, गुरनं-765/2021 भादंवि क. 392, 34 प्रमाणे.
- वळसंग पेालीस ठाणे, गुरनं-433/2021 भादंवि क. 392,34 प्रमाणे.
सोलापूर शहर – 07 गुन्हे - सदर बाजार पोलीस ठाणे, गुरनं-469/2021 भादंवि क. 379, 34 प्रमाणे.
- विजापूर नाका पोलीस ठाणे, गुरनं-464/2021 भादंवि क. 379 प्रमाणे.
- फौजदार चावडी पोलीस ठाणे, गुरनं-517/2021 भादंवि क. 394, 341, 504, 506, 34 प्रमाणे.
- फौजदार चावडी पोलीस ठाणे गुरनं-540/2021 भादंवि क. 379, 34 प्रमाणे.
- फौजदार चावडी पोलीस ठाणे, गुरनं-548/2021 भादंवि क. 379 प्रमाणे.
- फौजदार चावडी पोलीस ठाणे, गुरनं-655/2021 भादंवि क. 379 प्रमाणे.
- विजापूर नाका पोलीस ठाणे, गुरनं-451/2021 भादंवि क. 379 प्रमाणे. ;मोटार सायकल चोरीद्ध वरील प्रमाणे अटक आरोपीकडुन एकुण 11 गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच गुन्हयातील अटक आरोपी हा पिंपरी पोलीस ठाणे, गुरनं-461/2021, भादंवि क. 379 या गुन्हयात पाहिजे आरोपी आहे. अटक आरोपीचे साथीदार यांचेवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत विविध पोलीस ठाणेस गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांचे मार्गदर्षनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीश्ठ पोलीस निरीक्षक, सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली शैलेश खेडकर, पोलीस उप-निरीक्षक, श्रीकांत गायकवाड, पोलीस अंमलदार सलीम बागवान, दिलीप राऊत, हारिदास पांढरे, रवि माने, सचिन गायकवाड, चापोना/ केशव पवार यांनी बजावली आहे.