अभिनेता अंकित मोहन आणि अभिनेत्री रुची सवर्ण यांनी आता चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे.
आता अंकित आणि रुचीच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत.
अंकित आणि रुचीने सोशल मीडियावर बाप्पासोबत काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत अंकित रुचीचा बेबी बंप दाखवताना दिसतोय आणि अशा पद्धतीनं त्यानं चाहत्यांना तो लवकरच बाबा होण्याची बातमी शेअर केली आहे.
‘घर आजा परदेसी’ या मालिकेत अंकित आणि रुची या दोघांनी एकत्र काम केले होते. याच मालिकेतून दोघांचे सूत जुळले आणि 2 डिसेंबर 2015 रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली होती.
अंकित मोहन आणि रुची सवर्ण ही हिंदी मालिका विश्वातली मोठी नवे आहे. दोघांनी अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘मन फकीरा’ या चित्रपटातून अंकितने मराठी मनोरंजन विश्वातही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.