कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान बरेच झाले आहे. विशेषतः ज्या विद्यार्थ्यांमध्ये इंटरनेट व स्मार्टफोन ची सुविधा नाही , त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. उत्तरप्रदेशच्या गोरखपुर येथील पंधरा वर्षाची संध्या सहानी हिने तिच्याकडे स्मार्टफोन नसल्यामुळे जेव्हा शाळा सुरू झाली तेव्हा नावेतून शाळेत जाण्याचा पर्याय स्वीकारला.

आता ही मुलगी स्वतः नाव चालवत दररोज शाळेला जाते. गोरखपुर जिल्ह्यातील बहरामपूर येथे राहणारी संध्या कन्या विद्यालयात अकरावी मध्ये शिकते. स्मार्टफोन नसल्यामुळे ती ऑनलाईन क्लासमध्ये सहभागी होऊ शकत नाही. ती रहात असलेल्या भागांमध्ये पूर आल्यामुळे तिने नावेतून येणे-जाणे सुरू केले. मुश्किल परिस्थिती ठप्प प्रशासन आणि अनिश्चित भविष्य असून देखील हिंमत दाखवणारी संध्या खूप काही शिकवून जाते, असे ट्विट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे.