येस न्युज मराठी नेटवर्क ; औद्योगिक न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करुन एस्.टी, कामगारांचे वेतन त्वरीत द्यावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य संघर्ष कामगार युनियन पंढरपूर आगार यांचे वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी अध्यक्ष रमेश कोळी, उपाध्यक्ष पोपट शिंदे , रोहन तारापूरकर , राज्य उपाध्यक्ष कैलास पोपळे, बाळू जाधव, माऊली शिंदे तसेच कर्मचारी उपस्थित होते
