सोलापूर : हज यात्रा कमी पैशात करतो असे सांगून साठ हजार रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद मोहंमद सादिक महेबुबसाब बेपारी यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात केली आहे . बेपारी यांनी दिलेल्या तक्रारीत सुजातअली शेख , फिरदोस शेख आणि शहावेज शेख यांची नावे दिली आहेत. जेलरोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राऊत अधिक तपास करीत आहेत.
*
विवाहितेची सासरच्या सात जणांविरुद्ध तक्रार…
विमानतळ हत्तुरे वस्ती येथे राहणाऱ्या ऐश्वर्या चिंचोलीकर या विवाहितेने पती सोमनाथ चिंचोलीकर, सासरे नागप्पा चिंचोलीकर, दीर आकाश नागप्पा रेड्डी अशा सात जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आहे. पती , सासू, सासरे, नणंद या सर्वांनी मिळून मारहाण केली . तसेच माहेर कडून दोन लाख रुपये घेऊन ये असे सांगून नोंदवण्यास नकार दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शारीरिक व मानसिक त्रास दिला व नाव न घेता माहेरी हाकलून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस हवालदार पवार अधिक तपास करीत आहेत.
*
सिम चालू करण्यासाठी फोन केल्यावर 74 हजारांची फसवणूक…
श्रीरंग क्षीरसागर यांनी सिम कार्ड चालू करण्यासाठी एअरटेल कस्टमर केअर फोन केला असता अज्ञात आरोपीने केवायसी अपडेट नसल्याचे सांगितले . त्यानंतर गुगल प्ले स्टोअर ॲप वरून ऐनी डेस्क नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास सांगून बँक ऑफ महाराष्ट्रच्या डेबिट कार्ड संबंधी माहिती घेतली. नंतर या अज्ञात आरोपीने बँक खात्यातून 74 हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केल्याची फिर्याद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे . पोलीस निरीक्षक करण कोट अधिक तपास करीत आहेत.