मुंबई – पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या निकालाला आव्हान देत अटकेला आव्हान देणारी याचिका राज कुंद्राने दाखल केली होती. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. राज कुंद्रासह त्याच्या कंपनीतील आय.टी. प्रमुख रायन थॉर्पचीही अटक योग्यच आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
शर्लिन चोप्राची आठ तास चौकशी
पॉर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री शर्लिन चोप्राची मुंबई पोलिसांकडून तब्बल आठ तास चौकशी करण्यात आली. शुक्रवारी रात्री चौकशीनंतर तिला सोडण्यात आले. तर गरज पडल्यास पुन्हा चौकशीसाठी बोलावणार असल्याचीही शक्यता आहे. उद्योगपती राज कुंद्रा प्रकरणात शर्लिन चोप्रा हिचेदेखील काही लिंक लागत असल्यामुळे मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने तिची तब्बल आठ तास चौकशी केली. शर्लिन चोप्रा हिला आर्म्स प्राईम संदर्भात विचारण्यात आले. त्याचे नियम व अटी शर्ती काय आहेत? यासंदर्भात विचारण्यात आले. तसेच तुम्ही किती व्हिडिओ शूट केले आहेत. त्याच्याकडे प्रॉडक्शनचे भागीदार कोण आहेत? याबाबतही शर्लिनला विचारणा करण्यात आली. राज कुंद्रा हा पोर्नोग्राफी फिल्मच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार मानला जात आहे. राज कुंद्राची व्हिआन नावाची कंपनी असून तिचे केनरीन नावाच्या कंपनीसोबत टायप होते. केनरीन ही कंपनी लंडन स्थित आहे. राज कुंद्राच्या भावजीच्या मालकीची ही कंपनी आहे. त्याचे हॉट शॉट्स नावाचे एक अॅप होते. या कंपनीचे सर्व कॉन्टेंटची निर्मिती, या अपचे ऑपरेशन्स, अकाउंटिंग राज कुंद्राच्या मालकीच्या व्हिआन या कंपनीच्या मुंबईतील ऑफिसमधूनच होत होते. या प्रकरणाचा सखोल तपास करीत असताना हे सर्व धागेदोरे सापडले आहेत. यामध्ये काही व्हॉट्सअप ग्रुप, ई-मेल्स, अकाऊंट शीट्स सापडल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने पोर्नोग्राफी तयार करण्याच्या गुन्ह्यात राज कुंद्रासह 11 आरोपींना अटक केली आहे.