सोलापुरात शुक्रवारी हॉटेल बालाजी सरोवर मध्ये स्वर्गीय जॉन येवलेकर यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला .निमित्त होते देवमाणूस या पुस्तक प्रकाशनाचे . सुप्रसिद्ध सिने आणि नाट्य कलावंत गिरीश ओक, डॉक्टर सुहास पुजारी, आकाशवाणीचे सुनील शिनखेडे , साहित्यिक दत्ता गायकवाड आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये स्वर्गीय जॉन येवलेकर यांच्या देवमाणूस या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी रुपश्री येवलेकर ,फिलिप नदवी, अकबर सोलापुरी आदी उपस्थित होते. शोभा बोलली, बळवंत जोशी, सागर अचलकर आदींनी जॉन येवलेकर यांच्या कविता आणि गझल वाचन केले. गिरीश ओक यांनी जॉन येवलेकर यांच्या आठवणींना उजाळा देत कार्यक्रमाचे कौतुक केले डॉक्टर सुहास पुजारी यांनी जॉन येवलेकर कलावंत म्हणून किती श्रेष्ठ होते हे सांगितले सुनील शिनखेडे यांनीदेखील हा मनोगतामध्ये जॉन येवलेकर यांच्या आठवणी सांगितल्या साहित्यिक दत्ता गायकवाड यांनी देखील या वेळी मनोगत व्यक्त केले प्रारंभी रुपश्री येवलेकर यांनी सर जॉन येवलेकर प्रतिष्ठानच्या कार्याबद्दल आणि कार्यक्रमाबद्दल हेतू स्पष्ट केला त्यावेळी फिलीप नदवी आणि अकबर सोलापुरी यांनी देखील शुभेच्छा दिल्या