सोलापूर : सोलापूर येथील किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज शिवशाहीतर्फे सोलापूर महापालिकेत विविध प्रकारची ३०० रोपे भेट देण्यात आली. महापालिकेतर्फे एक लाख झाडांची वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजने या योजनेत सहभाग नोंदवित महापालिकेस तीनशे स्वदेशी झाडांची रोपे भेट दिली. याप्रसंगी महापालिकेतर्फे उपायुक्त धनराज पांडे व उद्यान निरिक्षक निशिकांत कांबळे, फॅक्टरी मनेजर विलास खरात, एचआर ऑफिसर ऋषिकेश कुलकर्णी, दैदीप्य वडापूरकर, अनिता राठोड, प्रशांत भोसले, अनील कुमार संकपाळ, शिवा कस्तुरे आदी उपस्थित होते पांडे यांनी या सहभागाबद्दल किर्लोस्कर कंपनी चे आभार मानले