नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या प्रतिष्ठित पद्म सन्मान पुरस्कारासाठी नामांकन करण्याचे आवाहन केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट केले आहे की, समाजासाठी विशेष योगदान दिलेली माणसं तुम्हाला माहिती असेल तर त्यांना पद्म पुरस्कारासाठी नामांकीत करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ट्विटरद्वारे लोकांना हे आवाहन केलं आहे. पद्म पुरस्कारासाठी नामांकन देण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट
पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की देशात अशी अनेक माणसं आहेत जी आपल्या मुळांशी जोडली असून विशेष काम करत आहे. त्यांच्या कामाचा फायदा समाजाला होत आहे. परंतु, आम्हाला त्यांच्याबद्दल फारच कमी माहिती आहे. आपण अशा लोकांना ओळखता का? तर तुम्ही त्यांना #PeoplesPadma (लोकांचा पद्म सन्मान) म्हणून नामांकित करा. अशा लोकांची नावे 15 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला पाठवता येईल.