सांगली जिल्ह्यातील धक्कादायक घटना
सांगली : मृत्यू झाल्यानंतरही दोन दिवस उपचार सुरु असल्याचे सांगत रुग्णाच्या नातेवाईकांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील इस्मालपुरात हा प्रकार घडला असून मृत्यूनंतरही मृतदेहाची विटंबना करत नातेवाईकांना उपचार सुरु असल्याचे सांगून पैसे उकळण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत हेल्थ केअरचा डॉक्टर योगेश रंगराव वाठारकर याला अटक केली आहे.सायरा हमीद शेख असे मृत महिला रुग्णाचे नाव आहे. सायरा यांचे उपचारादरम्यान ८ मार्चला सकाळी निधन झाले. मात्र डॉक्टर योगेश रंगराव वाठारकर यांने ही माहिती मुलगा सलीम शेख याच्यापासून लपवून ठेवली . नगरपालिका नोंदणी विभागात मृत्यू वेळ ८ मार्चला सकाळी११ वाजून ४८ मिनिटांनी झाली असल्याची नोंद आहे. मात्र, डॉक्टरांनी १० मार्चला मृत्यू झाल्याचं सांगत मृतदेह ताब्यात दिला. यामुळे नातेवाईकांना संशय आला. त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. डॉक्टर योगेश वाठारकर याने बनावट कागदपत्रं तयार करून ४१ हजार २८९ इतके ज्यादा बिल तयार केल्याचे निष्पन्न झाले .