सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील कामगारांना बसमधून सोलापुरात घेऊन येत असताना बाळे येथील ललित ट्रान्सपोर्ट समोर काचेवर दगड मारून ३० हजार रुपयांचे नुकसान केल्याने दोघांविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय वाडकर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सोलापूर महापालिका परिवहन ची बस क्रमांक एम एच 13/ 11 9516 या बसचे नुकसान झाले असून अभिषेक कदम आणि रमेश आवळे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नोकरी गेल्याने शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न
येस न्युज मराठी नेटवर्क : शिक्षकाच्या नोकरीतून निलंबन झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने महांतेश कट्टीमनी याच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्कलकोट येथील समता नगर मध्ये राहणाऱ्या कट्टीमनी यांनी पाच जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या आवारात नजीकच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर प्लास्टिक कँडमधील उग्र वासाचे रसायन अंगावर ओतून घेऊन काडीपेटी ने पेटवण्याचा प्रयत्न केला होता. सदर बझार पोलिस ठाण्याचे वाडीकर अधिक तपास करीत आहेत.